कोयता गँगचा बंदोबस्त करा -नागरिकांची हडपसर पोलीस ठाण्यात गर्दी

Date:

पुणे-हडपसर पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील मांजरी येथे कोयता गँगने दहशत पसरवली असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असून, या निवेदनाची प्रत हडपसर पोलिसांना दिली आहे. यावेळी  स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गँगने दहशत पसरवली आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याने जो ग्रामस्थ त्यांना विरोध करतो त्यांच्या घरावर दडगफेक केली जात आहे. कोयता गँगच्या दहशतीमुळे स्थानिक ग्रामस्थ तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. हडपसर पोलीस या टोळीवर अंकुश ठेवण्यात कमी पडत असल्याने मांजरी येथील स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात एकत्र जमून याचा निषेध नोंदवला. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मांजरी , काळेपडळ , गंगानगर या परिसरात गुन्हेगारांच्या टोळ्यांचा वावर वाढला आहे. या भागात आपल्या टोळीचे वर्चस्व राहावे,यासाठी दोन टोळ्यांमध्ये वाद होत असतात. यादरम्यान मांजरी परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असून,याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अडवून त्यांना लुटणे,महिलांचे दागिने लुटणे, हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करणे अशा घटनांमुळे मांजरी येथील नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली.परंतु कोयता गँगची दहशत कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.टोळीतील सदस्याला विरोध केला तर विरोध करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत या टोळीची मजल गेली आहे.मांजरी परिसरातील कोयता गँगवर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार केली असता, पोलिसांकडून आरोपींची बाजूघेतली जात आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगून पोलिसांकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे.मांजरी येथील ग्रामस्थांनी हडपसर पोलीस ठाण्यात एकत्र जमून या टोळीवर कारवाई करावी,अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढू ,असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...