पुणे, —–
‘फिटनेस मंत्रा’ च्या पुण्यात विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव आणि मार्केट यार्ड अशा चार शाखा असून मार्केट यार्ड येथे नव्याने सुरु करण्यात आलेली शाखा म्हणजे पुण्यातील पहिले ‘लक्झरी जिम’ ठरली आहे. मार्केट यार्ड भागातील रविराज सी.आर.यु. मॉल मधील सुमारे सहा हजार चौरस क्षेत्रफळाच्या जागेत विसावलेल्या या जिममध्ये इटलीच्या ‘टेक्नो जिम’ च्या अद्यावत तंत्रज्ञानाची खास सोय करण्यात आली आहे अशी माहिती ‘फिटनेस मंत्रा’ च्या संचालिका रेणू अगरवाल यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रसंगी जिमचे प्रशिक्षक कॉनरॉड ऑन्ड्रेड तसेच अनिल भदाले हे उपस्थित होते. या अत्याधुनिक जिमचे नुकतेच अभिनेत्री सन्नी लिओन हिच्या हस्ते औपचारिक उदघाटन करून ती कार्यान्वित करण्यात आली.
नागरिकांच्या उत्तम आणि निरोगी स्वास्थ्यासाठी ‘फिटनेस मंत्रा’ तर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात असे सांगताना रेणू अगरवाल पुढे म्हणाल्या, आमच्या जिममध्ये सूर्यनमस्कार, योगासह स्पा, एरोबिक डान्स आदी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून आरोग्य चांगले राहण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याला पोषक राहील याच पद्धतीने खास प्रशिक्षित ट्रेनर्सकडून कार्यक्रम ठरविले जातात व त्यासाठी वैयक्तिक लक्षही पुरविले जाते असेही त्यांनी सांगितले. ‘फिटनेस मंत्रा’ मध्ये मधुमेही आणि कर्करोग बाधित रुग्णांसाठी विशेष व्यायामाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सवलत देण्यात आली आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.