पुणे– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) कडून पायाभूत सोई सुविधा
निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या विविध प्रकल्पांच्या
अंमलबजावणीकरिता निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव (e-auction) पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खाजगी विकसकांना देण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया केली जात आहे.
सदर भूखंडाचा वापर त्याच्या अनुज्ञेय (Permission Uses) वापरासाठी आरक्षित करण्यात
आलेला आहे. त्यामध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे सदरच्या गावामध्ये शाळा, दवाखाने, क्रीडांगण,
व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वाचनालय, क्लिनिक, हेल्थ क्लब, योगा सेंटर, विद्यार्थी वसतिगृह,नोकरदार महिला वसतिगृह, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्र आदी सुविधा निर्माणकरणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. ई-लिलाव पद्धतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती https://eauction.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर वेबसाईटवर निविदाधारक यांच्यासाठी १0 दिवसांची मुद्दतवाढ देऊन नोंदणी करण्याची सुविधा
उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदरच्या निविदा सादर करण्यास दि. 22 मार्च २०२१ सांय.५.०० वा. पर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. सदर निविदेची ई-लिलाव प्रक्रिया (Livee-Auction) दि. २6 मार्च २०२१ रोजी सकाळी ११:०० वा. करण्यात येणार आहे. तरी https://eauction.gov.in या वेबसाईट द्वारे ई-लिलाव पद्धतीमध्ये समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
उपरोक्त नमूद सुविधा भूखंड अनुज्ञेय (Permission Uses) वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ
मुदतीच्या भाडेपट्ट्याने दिले जातील. ई-लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून अनुज्ञेय वापर पाहता सदर सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास मदत होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल, असे महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.
पीएमआरडीए कडून सुरु असलेल्या सुविधा भूखंडाचा ई-लिलाव-प्रक्रियेस १० दिवसांची प्रथम मुदतवाढ
Date:

