ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार, सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उप-मुख्यमंत्रिपदावर अजित पवार

Date:

मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांना समाविष्ट केले जात आहे. धर्मनिरपक्षेतेच्या तत्तावर स्थापित झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या या मंत्रिमंडळात सर्वच समुदायाच्या नेत्यांना जागा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही काही नेत्यांमध्ये आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काहींनी चक्क राजीनामा देण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे. नवीन मंत्रिमंडळात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/561812084400474/

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा परिचय

  • नाव : श्री. अजित अनंतराव पवार
  • जन्म : 22 जुलै
  • जन्म ठिकाण : देवळाली-प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
  • शिक्षण : बी. कॉम.
  • ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
  • वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा
  • अपत्ये : एकूण 2 (दोन मुले)
  • व्यवसाय : शेती
  • पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • मतदारसंघ : 201-बारामती, जिल्हा पुणे.
  • इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई : 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघ; 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा;

28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री : 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री : 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा); ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 23 नोव्हेंबर, 2019 ते 26 नोव्हेंबर, 2019 पर्यंत उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद

  • शिवसेना : संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, अनिल परब, उदय सामंत, शंकर राव गडाक (शिवसेना समर्थक), आदित्य ठाकरे
  • राष्ट्रवादी : अजित पवार, दिलीप वळसे पाटिल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील
  • काँग्रेस : अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, वर्षा गायकवाड, सुनील केदार, अमित विलासराव देशमुख, यशोमती ठाकुर, केसी पाडवी, असलम शेख

यांना राज्य मंत्रिपद

  • अब्दुल सत्तार
  • सतेज ऊर्फ बंटी पाटील
  • शंभुराजे देसाई
  • बच्चू कडू
  • विश्वजित कदम
  • दत्तात्रय भरणे
  • आदिती तटकरे
  • संजय बनसोडे
  • प्राजक्त तनपुरे
  • राजेंद्र पाटील यड्रावकर

घटक पक्षांना मंत्रिमंडळातून डावलले

मंत्रिमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डावलण्यात आले आहे. यामुळे घटकपक्ष नाराज असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पार्टी, सीपीएम, बहुजन विकास अघाडी हे सामील होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेतही घटक पक्षांना बोलवले नव्हते.

28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंसह 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरेंनी तिन्ही पक्षातील दोन-दोन मंत्र्यांसोबत मिळून 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. यात राष्ट्रवादीकडून जयंत पाटिल, छगन भुजबळ, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसकडून बालासाहेब थोरात आणि नितिन राउत यांनी शपथ घेतली होती.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/888946074870175/

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...