राज्यातील इंधन, वीज दरात सवलत मिळण्याची शक्यता, अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार अर्थसंकल्प

Date:

मुंबई-आज विधिमंडळात सोमवारी (ता.८ मार्च ) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे वर्ष २०२०-२१ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील उद्योग, व्यापार थंडावलेला आहे, अशा स्थितीत पवार हे राज्यातील जनतेला इंधनावरील कर व वीज दरात सवलत देऊन दिलासा देणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. दुपारी २ वाजता अजित पवार विधानसभेत तर विधान परिषदेत शंभुराजे देसाई अर्थसंकल्प मांडतील. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. परिणामी महागाई वाढली आहे. त्यावर उतारा म्हणून पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात अर्थसंकल्पात कपात केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर १ ते २ रुपये कमी होऊ शकतात. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी औद्योगिक वीज दर ९.३ टक्क्यांवरुन ७.५ टक्क्यांपर्यंत घटवले होते. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरीक वाढीव वीज िबलांमुळे हैराण आहेत. घरगुती वीज ग्राहकांना अर्थसंकल्पात अंशत: दिलासा मिळेल, अशी मोठी आशा नागरिक ठेवून आहेत.
गतवर्षी अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडला होता. तो ३ लाख ५६ हजार ९६८ कोटीचा होता. कोरोना साथीची चाहूल लागण्यापूर्वीचा तो अर्थसंकल्प ९ हजार ५११ कोटी रुपये तुटीचा होता. राज्याची हलाखीची आर्थिक परिस्थिती बघता यंदासुद्धा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची दाट शक्यता आहे. गेले काही वर्ष महसुली अंदाजाच्या व खर्चाच्या रकमा यांचा मेळ जमेनासा झाला आहे. यासंदर्भात लोकलेखा आणि अंदाज समितीने सरकारचे वेळोवेळी चांगलेच कान पिळलेले आहेत. किमान यंदा तरी या रकमांतील तफावत अल्प राहील, अशी अनुभवी वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून आशा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

पुणे, दि.२४: कृषी पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध,...