मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केलेत, गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना टोला लगावताना केलेले वक्तव्य भोवले .
हेमा मालिनी देखील संतापल्या
जळगाव- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याची तुलना थेट दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालाशी केली होती. धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये बोलताना पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर आज सकाळपासून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी अखेर माफी मागितली आहे. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी केली आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापले होते.गुलाबराव रावांनी केल्याल्या त्या वक्तव्यानंतर खुद्द हेमा मालिनीने देखील आक्षेप घेतला होता. तर भाजप नेत्यांनीही जोरदार टीका केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील गुलाबराव कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर अखेर गुलाबरावांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.दिलगिरी व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो’ असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.
प्रवीण दरेकरांची कारवाईची मागणी
‘गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखर चुकीचे विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल’, असे ट्विट करत प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली.