मुंबई-मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून साकलो ११.०५ वाजता बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता.

