( खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू झाल्याचे छाया चित्र रात्री 12 :30 वाजता)
पुणे- सतत धार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण रात्री साडेदहा वाजता ८५ टक्के भरल्याने पाटबंधारे विभागाने रात्री साडेअकरा वाजता मुठा नदीत ८५६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केल्याचे योगेश भंडलकर, स्वारगेट उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी सांगितले .

सायंकाळी ५ वाजता हे धरण ७५.६० टक्के भरलेले होते . सायंकाळी ५ वाजेपर्यंत २२ मिमी एवढा पाउस खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला होता , त्यावेळी १००५ क्युसेस एवढे पाणी मुठा उजव्या कालव्यातून सोडण्यात येऊ लागले . परंतु त्यानंतरही पावसाची सतत धार सुरूच होती. आणि धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत होती .सायंकाळी ५ वाजता पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती नुसार पुण्याच्या चारही धरणात मिळून एकूण ९.४७ टीएमसी म्हणजे ३२.४८ टक्के पाणीसाठा झाला होता जो याच दिवशी गेल्या वर्षी २९.६२ टक्के एवढाच होता . गतवर्षाच्या साठवनुकीला यंदा आजच्या दिवशी तरी ओलांडले आहे.
खाली पहा आज सायंकाळी ५ वाजता असलेली धरणांच्या पाण्याची स्थिती आणि पाऊस
Subject: khadakwasala Complex gauges 11.7.2022/5.00 pm,
Rain(mm/Total/TMC/%/Inflow/Mtr)
1)Khadakwasala –
22/187/1.49/75.60%/+214/581.44
NMRBC- 1005
2)Panshet– 84/831/3.45/32.41%/+201/618.84
3)Warasgaon–
75/791/3.85/30.00%/+291/621.20
4)Temghar–
60/903/0.68/18.29%/+60/ 679.10
Total Inflow 4 Dam= 766 mcft
Total contents of 4 Dams-
9.47 TMC/32.48%
Last year-
8.63 TMC/ 29.62%

