काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मिडीयात चालणाऱ्या बातम्यांवरून व आजवरच्या मोदीसरकारच्या कारभारावरून शनिवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विट केले- लवकरात लवकर आपल्या पेट्रोलच्या टाक्या भरून ठेवा. मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे. भाजप सरकार निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबवते आणि निवडणुका संपल्या की लगेचच दर वाढवल्याचा आरोप काँग्रेस नेते करत आहेत.भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मते मागत आहेत. भाजप संपूर्ण देशात हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा आहे. परंतु, भाजप लोक खोट्या गोष्टींच्या आधारे मते मागत आहेत. पंतप्रधान मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक आपापली खूर्ची वाचवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.अनेक दिवसांपासून भाजप सरकार निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ थांबवते आणि निवडणुका संपल्या की लगेचच दर वाढवतात असा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा सध्याचा टप्पा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 7 मार्चला संपणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
मनमोहनसिंग यांच्या काळात पेट्रोल डीझेल दरवाढीवर टीका करणारे आता दरवाढ करून लुटत आहेत
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवाढ आणि किमतीचा आलेख पाहता मनमोहन सिंग यांनी किती आटोक्यात इंधनाच्या किमती ठेवल्या होत्या त्याची कल्पना येते , परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या किमती पाहता आणि प्रत्यक्षात भारतातील इंधनाच्या किमती पाहता सरकार खुलेआम जनतेची लुट करत आहे असे सूत्रांनी सांगितले. पण आता विरोधकांनाही वाटते आहे जाऊ देत आम्ही चांगले वागलो त्याचे फळ मिळाले आता भरू देत यांना ,साव्वाशेने पेट्रोल ..होऊ देत हौस ….

