येरवडा कारागृहात दोन गटात मारहाण; तुषार हंबीर जखमी

Date:

पुणे : खुनाच्या प्रकरणातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून मंगळवारी सकाळी सात वाजता येरवडा कारागृहात मारहाणीची घटना घडली. त्यामध्ये एका कैद्याच्या डोक्यासह मानेवर खिळ्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी ससुनमध्ये दाखल करण्यात आले आहे. तुषार हंबीर असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर शाहरुख शेख असे मारहाण करुन वार करणाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात असलेल्या तुषार हंबीरवर शाहरुख शेख याने खिळ्याने वार केले. हंबीर हा हिंदू संघटनेचा संघटक असून तो हडपसर येथील मोहसीन शेख खुनातील आरोपी आहे. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या हंबीर याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थली दाखल झाले होते. ही घटना घडल्यावर तुरुंग प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

कारागृहाबाहेरही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुरुंग प्रशासनाकडून घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

”दोन्ही आरोपी खुनाच्या गुन्हयामध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाले असण्याची शक्‍यता आहे. बराकीतून त्यांना सकाळी बाहेर सोडण्यात आल्यावर शाहरुख शेखने हंबीरवर खिळ्याने वार केले. यानंतर हंबीरला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे”,असे कारागृह प्रशासनतर्फे सांगण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिले वहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने...

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...