पुणे- आज बुधवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशनच्या वतीने कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर भिवरी गावठाण व विठ्ठलवाडी, घिसरेवाडी, नाटकरवाडी, माळवाडी, पठारवाडी, गायकवाडवाडी, येथील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले सांगाळता यावे तसेच कोरोना आजारापासून संसर्ग होवू नये यासाठी सेफ्टी मास्क, सॅनेटायजरचे वाटप भोर पुरंदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव, तहसीलदार रूपाली सरनोबत येवले अमृततुल्यचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ येवले आणि मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भिवरी कर ग्रामस्थ व येवले फाऊंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फाऊंडेशनच्या वतीने 15 स्वयंसेवकांच्या टिम तयार करून सर्व गावात व वाडीवस्तीवर मास्क व सॅनेटायजर वाटप करत कोरोना वाइरस विषयी आबालवृद्धांना गावात माहिती देत कोरोना विषाणू विषयी लोकजनजागृती केली.
यावेळी भोर पुरंदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, आणि तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी उपस्थित ग्रामस्थांना कोरोना विरोधी लढाईविषयी मार्गदर्शन करत घरी राहा. स्वच्छता पाळा सुरक्षित राहा, देश वाचवा. आफवावर विश्वास ठेवू नका. काही अडचण असेल तर प्रशासनाशी संपर्क साधा असे आवाहन केले.
यावेळी सोशल डिशटंशनचे पालन करण्यात आले.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ येवले यांनी तर सुत्रसंचालन माऊली घारे तर आभार मोहीनी लोणकर यांनी केले.




