येवले फाऊंडेशन पोहचले जीवनावश्यक वस्तूंसह गरजूंच्या घरी..

Date:

सामाजिक उत्तरदायित्व जप्त केली जनजागृती

भिवरी ( ता.पुरंदर) : कोरोना वाइरसचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्याला नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे मोलमजुरी करणार्‍या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झाला. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील सुप्रसिद्ध येवले अमृततुल्यच्या वतीने येवले फाऊंडेशनच्या माध्यमातून आस्करवाडी ( ता. पुरंदर) येथील गरजु , कष्टकरी शेतकरी कुटुंबियांना घरगुती जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप करत कोरोना वाइरस विषयी गावात जनजागृती करत एक सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.

कोरोना वाइरस मुळे संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट भरणारे लोक, शेतकरी, कष्टकरी कामगार यांना रोजगार उपलब्ध नाही. आज लॉकडाऊन होऊन दहा दिवस झाले आहे. ग्रामीण भागात उन्हाळा चालू असल्याने शेतात कामे नाही. त्यामुळे शेतकरी व गोरगरीब मजुर वर्गांना देखील हाताला काम उरले नसून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलाबाळांसोबत कुटुंबाचे पोट कसे भरायचे असा प्रश्न पडला असतानाच. येवले फाऊंडेशनने आपली एक संवेदनशील सामाजिक बांधिलकी लक्षात घेत आस्करवाडी येथील गरजु शेतकरी कुटुंबांना गहु, ज्वारी बाजरी तांदुळ, साखर, चहापावडर तुरडाळ, मुगडाळ, कोलगेट, धुण्याचा साबण, कपड्याचा साबण, मसाले आदी जीवनावश्यक किराणा वस्तुचे वाटप केले. यासाठी त्यांनी सात टिमच्या माध्यमातून वस्तुंचा वाटप केले. या उपक्रमामुळे गरजूंना काही दिवस आधार मिळण्यास मदत झाली.

यावेळी येवले अमृततुल्यचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ येवले, आस्करवाडीचे सरपंच परशुराम पायगुडे, माजी सरपंच जालिंदर वाडकर, पोलीस पाटील मनोज पायगुडे, गणेश येवले, निलेश येवले, विजय येवले, शैलेश येवले, दिपक येवले, तेजेस येवले, मंगेश येवले, विश्वास येवले, दत्तात्रेय येवले, पप्पू येवले, अशोक येवले, आदी फाऊडेशनने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...