पुणे- कोरोनाशी पुणे योग्य प्रकारे फाईट करत आहे, हा लढा जरूर दीर्घकालीन आहे मात्र अवघड नाही ,पुणेकरांनी साथ दिली तर हा लढा आपण सहजगत्या जिंकू शकतो असा विश्वास पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे .कोरोना ने मरण पावलेल्या काही रुग्णांचे नातेवाईक शव घ्यायला आले नाहीत तेव्हा महापालिकेला पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करावे लागले या साठी मुस्लीम समाजातील काही तरुणाई पुढे आल्याने आम्हाला हे शक्य झाले असा उल्लेख हि त्यांनी केला . माय मराठी शी बोलताना श्री गायकवाड म्हणाले ,महापालिकेच्या रुग्णालयात साधने जरूर अपुरी आहेत ,पैशाहून अधिक आम्हाला हि साधने महत्वाची आहेत म्हणून सीएसआर मधून सहाय्य करणारे उद्योजक आणि स्वयंसेवी संस्था यांनी अशा प्रकारची आम्हाला आवश्यक असलेल्या साधनांचा पुरवठा करावा आसे माझे आवाहन आहे. अगदी लॉकडाऊन संपल्यानंतरही कोरोनामुळे आपल्याला आपली जीवन पद्धती बदलावी लागणार आहे. नेमके आयुक्त गायकवाड यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात …..
कोरोना -लढा दीर्घकालीन ,मात्र अवघड नाही -आयुक्त शेखर गायकवाड (व्हिडीओ)
Date:

