झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी वैद्यकीय पथक पोहोचविणे बनले जिकीरीचे …
पुणे- कासेवाडी झोपडपट्टी सह असलेला भवानीपेठ परिसर कोरोनाने हैराण झालेला असताना इथे संचारबंदीच्या काळात देखील दारोदारी वैद्यकीय पथक जाऊन ,नेवून इथल्या लोकांचे प्रबोधन करता करता पथकांची कसोटी लागते आहे आणि बागवे पितापुत्रांना मोठी शर्थ करावी लागत असताना दिसून आले आहे.
पुण्यात भवानीपेठ परिसर रेड झोन म्हणून घोषित झाला आहे आता पर्यंत सुमारे ११ लोकांचा बळी कोरोना ने घेतला आहे. लोकांना घरपोच किराणा माल ,साहित्य देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज कासेवाडी या परिसरात वैद्यकीय पथक महापालिकेच्या सहाय्याने नेवून घरोघरी लोकांची वैद्यकीय विचारपूस करत तपासणी करण्यासाठी शर्थ केली पहा हा एक व्हिडीओ रिपोर्ट ….

