पुणे-एक मुलगा दुबईत आणि दुसरा मुलगा व मुलगी मुंबईत अशा अवस्थेत कोरोना संकटाच्या काळात ९२ वर्षीय एका आई ला आधार देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले धाऊन आलेत . एकटी पडलेली आई आणि इछ्या असूनही तिच्या देखभालीसाठी येवू न शकलेली मुले यांची अडचण ओळखून भिमाले यांनी आज या ९२ वर्षीय आईला नारायण पेठेतील सहजीवन हॉस्पिटल मध्ये रुजू करवून दिले आहे. एकटी राहण्यापेक्षा तिथे तिची देखभाल व्यवस्थित होईल अशी आशा त्यांना आहे. आणि अडकून पडलेल्या मुलांनाही तिची चिंता राहणार नाही अशी त्यामागची भावना असल्याचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी सांगितले कोरानाच्या संकटाने अनेकांना घरात एकत्र आणले हे खरे असे तरी कामानिमित्त आपल्या आईवर दूर राहूनही लक्ष ठेवणाऱ्या ,आणि अधून मधून प्रत्यक्ष भेटणाऱ्या आप्तीयांची मोठी अडचण करून ठेवली आहे. लॉक डाऊन ,संचारबंदी , विमान सेवा ,बस सेवा ,रेल्वे बंद अशा कोरोनाच्या फाईट च्या काळात अडकून पडून एकमेकांपासून दूर पडलेल्या आप्तीयकांना कोरोनाचा मोठा झटका हि बसला आहे. आणि भावनिक चिंतेने त्यांना ग्रासून टाकले आहे.

