वाल्मिकी समाजाचे उत्सव हे सांस्कृतिक वैभव : खा. अमोल कोल्हे

Date:

पुणे :लष्कर बेडा पंचायत,गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्ट च्या वतीने आयोजित भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळा शनीवारी रात्री उत्साहात पार पडला. हा सोहळा खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गोगामेडी मंदिर, पूलगेट येथे झाला.खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते जन्मोत्सवानिमित्त आरती झाली.
    डॉ, सुब्रत पाल ( मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे कॅन्टोन्मेंट  बोर्ड ),  आळंदी गोरक्षनाथ मठाचे दिग्विजयनाथ महाराज, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजय भोसले (शिंदे गट ) , जांबुवंत मनोहर ( युक्रांद) , दीपक गायकवाड ( वंचित बहुजन  आघाडी ) , शुभम सारवान,  लष्कर बेडा पंचायतचे आणि गुरू गोरखनाथ गोगाजी ट्रस्टचे पदाधिकारी होते. सुदेश सारवान आणि कवीराज संघेलिया यांनी पंचायत आणि समिती तर्फे आभार मानले.
‘वाल्मिकी समाजाचा हा उत्सव हे पुण्याच्या अनेक सांस्कृतिक वैभवापैकी एक वैभव आहे आणि ते टिकवून ठेवावे ,असे आवाहन खा. अमोल कोल्हे यांनी   केले.सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने छोट्या-मोठ्या समाजांच्या उत्सवांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन ऐक्य निर्माण करावे ,भारत हा विविधता असणारा देश आहे. हे वैविध्य आपल्याला अशा उत्सवांमधून दिसून येते. तळागाळात काम करणाऱ्या आणि संख्येने छोट्या असणाऱ्या समुदायांच्या उत्सवांमध्ये आपण विशेष करून सहभागी झाले पाहिजे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे ‘,असेही ते म्हणाले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...