फर्ग्युसन च्या प्राचार्यांकडून २२ विद्यार्थ्यांवर कारवाई — प्राचार्यांचीच चौकशी करा .. राष्ट्रवादीची मागणी

Date:

पुणे – कॉलेज आवारातील देशद्रोही घोषणाबाजीबाबत  ची पोलिसात दिलेली तक्रार फर्ग्युसन च्या प्राचार्यांनी मागे घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच .. त्यांनी आता  २२ विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचा आरोप करीत आज या प्रचार्यांचीच चौकशी करून त्यंच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी ने  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत. तर केवळ मनुवाद आणि साम्राज्यवादाविरोधी घोषणा देण्यात आल्या, असे म्हणत उपायुक्त तुषार दोशी यांनी विद्यार्थ्यांना क्लिन चिट दिली असताना आता हा नवा प्रकार काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .
येथील फर्ग्युसन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह घोषणा केल्याच्या कारणावरून सदर कॉलेजच्या प्राचार्यांनी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे, हे वृत्त समजताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच निवेदनाच्या माध्यमातून सदर घटनेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारचे गैरवर्तन केलेले नसून त्यांच्यावर केलेली कारवाई थांबवावी आणि संबंधित प्राचार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही निरपराध विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार नाही, असे ठामपणे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यात मेघगर्जना , वीजांचा कडकडाट ,वादळी वारे , गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता

🌦️ कृषी हवामान सल्ला: महाराष्ट्र राज्यकालावधी: 31 मार्च ते...

कौशल्य विकासाचे नवीन युग: मंत्री  चंद्रकांतदादा पाटील

फ्युएल-एनएसई बेल रिंगिंग सोहळ्यात 'कमवा आणि शिका' मुलींसाठी विद्यावेतन...

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली- कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन...

जगातील सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा एक एप्रिल 2026 पासून होणार सुरू

देशभरातील जनगणतेत 30 लाखांहून अधिक जनगणना कर्मचारी, पर्यवेक्षक आणि...