पुणे- माझ्या प्रभागात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पदाधिकारी बळ देत आहेत , अहो माझ्या प्रभागात मनसेच्या पदाधिकाऱ्याचा उदो उदो चालला आहे .अहो आमच्याकडे आम्हाला डावलून कॉंग्रेसच्या नगरसेवकाला सहाय्य केले जातेआहे.. हो पण करतंय कोण ? आमचेच पदाधिकारी …तुम्ही तक्रार का करत नाही ? तुमच्या प्रदेशाध्यक्ष , खासदार या नेत्यांकडे … ‘नाही ओ ..आता काही उपयोग नाही .. ऐन निवडणुकीत आमच्या तिकिटाला हे धोका निर्माण करतील ..या मुळे काही बोलता येत नाही ..आम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय पण.. आमच्याकडून मदत होण्या ऐवजी आमच्याच पदाधिकाऱ्यांची साथ विरोधी पक्षांना असल्याने त्यांच्याकडून झटपट मदत होतेय . आमचे प्रस्ताव , मागण्या लेखी द्यावे लागतात अन विरोधी पक्षांच्या काही या ठराविक नगरसेवकांनी फोन केले तरी आमचे पदाधिकारी त्यांच्या समवेत असल्याने त्यांची कामे होतात ….हि व्यथा आहे भाजपमधील भल्या भल्या मान्यवर नगरसेवकांची आणि त्यांची संख्या जवळपास ५० ते ६० एवढी असूनही पुण्यात भाजपचे नेते म्हणून मान्यता पावलेले कोथरूड चेआमदार आणि पुण्याचे भाजपमधील अनुभवी , व्यक्तिमत्व असलेले खासदार यांना याबाबत खबर लागू नये म्हणजे आश्चर्य मानले जात आहे. मुळात याची ठिणगी पडायला , पक्षाचे नेतेच कारणीभूत असल्याचा काहींचा दावा आहे . तो कसा / विचारता , यांच्या नेमणुका यांनीच केल्या ना ?पण आता ते जास्त अडकले राज्याच्या , केंद्राच्या राजकारणात .. आणि महापालिकेच्या राजकारणात सर्वस्वी वर्चस्व प्रस्थापित केले ते नेत्यांहून पदाधिकाऱ्यांनी … आणि नेत्यांशी कसे बोलायचे ..प्रत्यक्षात काय करायचे हे सारे ठाऊक असलेले मुरब्बी पदाधिकारी आहेत .आमच्या समस्या , नागरी समस्यांवरील आमची सर्व कामे, नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचण्याची संसाधने यात अडचणी आणून हे पदाधिकारी स्वतः नेते व्हायला निघाले आहेत . कोरोना च्या वाढत्या समस्येवर प्रभावी कामकाज करण्या ऐवजी यांनी विरोधी पक्षातील ठराविक धेंडाना बरोबर ठेऊन आपमतलबी राजकारण करण्यास प्राधान्य दिले . आणि केवळ यामुळेच पुण्याला कोरोनाच्या तडाख्याने हैराण केले .कथा आणि व्यथा पूर्वे पासून पश्चिमेपर्यंत ,उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या भाजपा नगरसेवक नगरसेविकांच्या खाजगीत ऐकायला येतात .राज्याच्या राजकारणात व्यस्त असलेल्या देवेंद्र फडणविसांच्या कानावर आपली अशीच व्यथा घालण्याचा प्रयत्न एका नगरसेविकेने केला पण प्रतिसाद शून्य . .. त्यामुळे तिकिटात आता स्वारस्य …आणि वैयक्तिक होईल तेवढे जनतेच्या कामात . पक्षाचे आणि पक्षाच्या नेत्यांचे सहाय्य मिळतच नाही . हि व्यथा बनली आहे १०० नगरसेवकांचे बळ मिळालेल्या पक्षाची ..अर्थात महापालिकेत एक हाथी सत्ता असलेल्या भाजपची ..आणि दोन पदाधिकाऱ्यांना मानणारे २ गट आणि शेवटी जे जे होईल ते ते पाहत राहावे असा एक गट अशी तीन शकले १०० च्या बळाची होताना दिसत आहेत .आणि ज्यांना इथली सत्ता संभाळायला दिली आहे .. ते कुपंणच भर भर शेत खाण्यात व्यस्त आहे, अशा संशयाचे वातावरण आहे, यामुळे राज्यात सत्ता नसल्याने तिथे सत्ता यावी म्हणून जीवाचा आकांत करणारे नेते जिथे सत्ता आहे त्या पुणे महापालिकेत सत्ता सांभाळू शकतील काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.