Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘व्हिको टर्मरिक प्रेझेंट्स फेमिना ऑफिशियली गॉर्जस २०१६’ स्पर्धा पुण्यात संपन्न

Date:

पुणे – पुण्यात नुकतेच ‘व्हिको टर्मरिक प्रेझेंट्स फेमिना ऑफिशियली गॉर्जस २०१६’ या खास सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवतारा प्रॉपर्टीज, शीतल क्रिएशन्स, स्किन अँड यू क्लिनिक व टॅलेंट हंट यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले होते. कोरेगाव पार्कमधील ओ हॉटेलमध्ये हा कार्यक्रम शानदार वातावरणात संपन्न झाला. कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला दैनंदिन आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या पदावर काम करत असतात आणि आपले व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याचा समर्थपणे समतोल साधत असतात. अशा महिलांतील स्पर्धात्मक चैतन्य व सुप्त बुद्धिमत्ता जगापुढे यावी, या हेतूने या स्पर्धा व्यासपीठाची रचना करण्यात आली आहे. स्पर्धेत देशभरातील गो एअर, एल अँड टी इन्फोटेक, सिट्रस हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांतील १७ महिलांनी भाग घेतला. या स्पर्धकांनी ‘ऑफिशियली फ्लॉलेस’, ‘ऑफिशियली गुड कॉम्प्लेक्शन’, ‘ऑफिशियली एम्पॉवर्ड’, ‘ऑफिशियली चिक’, ‘ऑफिशियली फिट’ व ‘ऑफिशियली कॉन्जेनायल’ अशा श्रेणींतील किताबांसाठीही चुरशीने स्पर्धा लढवली.

 

पहिल्या फेरीत स्पर्धकांनी शीतल क्रिएशन्सने तयार केलेली सुंदर वस्त्रप्रावरणे परिधान करुन स्वतःचा संक्षिप्त परिचय करुन दिला. दुसऱ्या फेरीत या महिलांनी आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय घडवला. आपण भविष्यातील एक ब्रँड असून त्यात इतरांनी त्यांचा वेळ व साधनसंपत्ती का गुंतवावी, याचे सादरीकरण त्यांनी केले. या फेरीतून निवडल्या गेलेल्या ५ स्पर्धकांना रॅपिड फायर राऊंड या प्रश्नमंजुषा फेरीला सामारे जावे लागले. परीक्षक मंडळातील सर्व तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नसंचांना उत्तर देताना या स्पर्धकांनी आपल्यातील कौशल्य, विनोदबुद्धी व हजरजबाबीपणाचा प्रत्यय आणून दिला.

 

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिसेस (सीजीएचएस) विभागातील डॉ. शिवांगी मालेतिया यांनी ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जस क्राऊन’ हा मुकूट पटकावला. हजरजबाबी विनोदी वृत्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी परीक्षकांना प्रभावित केले. सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमधील क्लायंट रिलेशनशिप मॅनेजर प्रज्ञा राजपाठक या प्रथम क्रमांकाच्या उपविजेत्या, तर मुंबईतील एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडमधील लीगल सेक्शनच्या असिस्टंट मॅनेजर मानसी मेहरोत्रा या दुसऱ्या क्रमांकाच्या उपविजेत्या ठरल्या.

 

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री व गायिका इव्हलिन शर्मा, ‘फेमिना’च्या विभागीय संपादक कोरिना मॅन्युएल, ‘शीतल क्रिएशन्स’च्या  मालक व डिझायनर शीतल बियाणी, ‘शिवतारा प्रॉपर्टीज’चे संचालक निलेश सिंग, ‘स्किन अँड यू क्लिनिक’च्या संस्थापक, त्वचारोगतज्ज्ञ व सौंदर्योपचार तज्ज्ञ डॉ. गीता ओबेरॉय व ‘ऑक्स्फर्ड प्रॉपर्टीज’च्या संस्थापक संचालक नीलम सेवलेकर यांनी काम पाहिले.

 

या समारंभाला पुण्यातील नामवंत उपस्थित होते. त्यात ‘व्हिको’चे अजय देवस्थळे, ‘पिॲजिओ’चे संतोष देशमुख, ‘डिव्हिक्रिआ’च्या दिव्या आगरवाल, डिझायनर रुबी पाषाणकर, ‘नेटसर्फ’चे रुबानी, सुजीत जैन, ‘बिक्रम योगा’च्या पालोमा गंगोपाध्याय, निरजा व किशन गुप्ता, हृषिकेश शिरोडकर, टिना व समीर दुआ, डिझायनर द्वयी श्रुती व मंगेश महादेव, हिल्टन रेस्टॉरेटीच्या ‘डबल ट्री’चे सरव्यवस्थापक सहदेव मेहता, सामाजिक कार्यकर्ते दरायस दोराबजी, विद्या तिवारी, कारी मस्कारेन्हास, धारिणी व कुणाल तुराखिया, रीमा तावरे, ‘व्हीपीटीए’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक पवार, ‘स्किनसिटी’चे डॉ. नितीन ढेपे, ‘अटेलियर’च्या रोहिना नागपाल आदींचा समावेश होता.

 

यासंदर्भात ‘फेमिना’च्या संपादक तनया चैतन्य म्हणाल्या, की कंपनीत पाच मिनिटांची संचालक मंडळाची बैठक, पाठोपाठ तासभराची ऑफिस पार्टी व नंतर मित्र-मैत्रिणींसमवेत धमाल कॉकटेल सेशन असा कार्यक्रम असेल तर तो नऊ ते पाच या कामाच्या वेळातील सर्वांत मोठे आव्हान ठरतो. प्रत्येक मिनीट आपली परीक्षा घेत असते. आपल्यातील काहीजणी हे संयोजन इतरांहून अधिक चांगल्या पद्धतीने करतात. ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जस’ ही स्पर्धा अशा तरुणींचा शोध घेते ज्या व्यवसाय कौशल्य आणि तेही नेहमी स्टाईलमध्ये प्रदर्शित करतात.

 

फेमिना इंडियाविषयी

‘फेमिना’ हे मासिक प्रथम जुलै १९५९ मध्ये प्रकाशित झाले आणि गेल्या ५६ वर्षांहून अधिक काळ ते भारताचे पहिले आणि सर्वाधिक वाचले जाणारे महिलांचे इंग्रजी मासिक म्हणून आपली ख्याती टिकवून आहे. प्रगतिशील महिलांसाठी ते प्रदीर्घ काळ निश्चित जीवन व जीवनशैलीचे मार्गदर्शक ठरले आहे. या मासिकाची मालकी ‘टाइम्स ग्रुप’ची संपूर्ण उपकंपनी असलेल्या ‘वर्ल्डवाईड मीडिया’कडे आहे. ‘फेमिना’ दर पंधरवड्याला प्रसिद्ध होते व त्यात कर्तबगार महिला, नातेसंबंध, सौंदर्य व फॅशन, प्रवास, पाककृती, आरोग्य व तंदुरुस्ती यावरील लेख असतात. अलिकडच्या काही वर्षांत या मासिकाने फेमिना हिंदी, फेमिना तमीळ व फेमिना बांगला अशा भाषिक आवृत्त्याही काढून वाचकांपर्यंतची पोच वाढवली आहे. ‘फेमिना’तर्फे देशभरातील सौंदर्य व्यावसायिकांसाठीचे ‘फेमिना सलून अँड स्पा’ हे मासिकही प्रकाशित केले जाते.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...