पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना आदरांजली वाहण्यासाठी आबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती. १९०२ ते १९०५ या कालावधीत महाविद्यालयाच्या वसतिगृह क‘मांक एक मधील खोली क‘मांक १७ मध्ये सावरकरांचे वास्तव्य होते. आज ही खोली सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. सावरकरांच्या अर्धपुतळ्याला सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी कविता वाचन केले. विनता जोशी यांनी पोवाडा गायन केले. उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, प्रा. सचिन खेडकर, दिलीप कोटिभास्कर, डॉ. सुनील भंडगे, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, जिल्हा मु‘य न्यायाधीश सुमंत कोल्हे, सावरकरांचे अभ्यासक श्री. म. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.