मुंबई-रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की राष्ट्रीय महामार्गांवरील फी प्लाझामधील सर्व लेन 15/16 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपासून “फी प्लाझाची फास्टॅग लेन” म्हणून घोषित करण्यात येतील. त्यामुळे एनएच शुल्क अधिनियम 2008 नुसार FASTag लेनमध्ये प्रवेश करणारे FASTag न बसवलेले कोणतेही वाहन किंवा वैध, कार्यरत FASTag शिवाय प्रवेश करणाऱ्या वाहनांना त्या श्रेणीस लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.
आज जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की डिजिटल पद्धतीने फी भरायला चालना देण्यासाठी, प्रतीक्षा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि फी प्लाझामधून विनाव्यत्यय प्रवास करता यावा यासाठी हे केले गेले आहे. मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पासून मोटार वाहनांच्या एम अँड एन प्रवर्गात FASTag बसवणे अनिवार्य केले होते.
प्रवर्ग ‘एम’ म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे कमीतकमी चार चाकी मोटर वाहन आणि ‘एन’ मालवाहतूक करणारे किमान चारचाकी वाहन जे सामानाबरोबरच माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.

