प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांचे “मनात” ऑडीओबुकमध्ये संदीप खरे यांच्या आवाजात! फक्त स्टोरीटेलवर!!

Date:

स्टोरीटेल मराठीवर मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अत्यंत वेगळी कादंबरी “मनात”चे ऑडीओबुक प्रकाशित होत आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून एरिक फ्रॉम पर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख तसेच मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत – एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या ऑडीओबुक ऐकायला मिळणार आहे. मन म्हणजे काय? मनाचा शोध घेताना, प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला असून प्रसिद्ध कवी, गायक अभिनेता संदीप खरे यांच्या रसाळ वाणीतून स्टोरीटेल मराठीवर हे ऑडिओबुक ऐकण हा प्रसन्न अनुभव आहे.

देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा लेखक अच्युत गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे. अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

अच्युत गोडबोले लिखित “मनात’ या मानसशास्त्रावरील पुस्तकच्या केवळ सात आठवड्यांत सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात ‘मनाचे श्‍लोक’ न वाचलेली व्यक्ती दुर्मिळच असेल. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्‍लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या “मन’ नावाचं प्रकरण लेखकाच्या मनात कायम डोकावल्याचं जाणवतं. साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या “मनाच्या’ दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखक अच्युत गोडबोले यांच्या मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ लाभलं आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्‍यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना सहज कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. संदीप खरे यांच्या मधुर आवाजात स्टोरीटेलवर हे ऑडिओबुक ऐकायला सुरवात करताच श्रोते या श्रवणानंदात पूर्ण गुंगून जातात. हे ऑडिओबुक संपूर्ण ऐकल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.

प्रसिद्ध सामाजिक विचारवंत आणि संशोधक डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे, समाजाचं मानसशास्त्राबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर, विविध विद्यापीठांतले मानसशास्त्राचे विभागप्रमुख अशा सर्वांनी मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायांनी “मनात’ या पुस्तकाच्या उपयुक्ततेवर आणि सौंदर्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे.

‘स्टोरीटेलवर ‘मनाचा ताबा घेणारं हे अप्रतिम’ ऑडिओबुक ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.
स्टोरीटेलवर हे ऑडिओबुक ऐकण्यासाठील लिंक
https://www.storytel.com/in/en/books/manaat-1335489

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...