प्रसिद्ध व्हॉयलिनवादक प्रभाकर जोग यांचे निधन

Date:

पुणे-

ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रभाकर जोग यांनी गाणारं व्हॉयलिन कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॉयलिन वादनाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली होती.

जोग यांच्या व्हॉयोलिनच्या सुरांनी प्रसिद्ध गीतरामायणालादेखील समृद्ध केले होते. तसेच व्हायोलिन वादनाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 6 दशके संगितक्षेत्राची सेवा केली आहे. त्यांना 2017 साली गदिमा आणि 2015 साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

प्रभाकर यांनी वयाच्या 5-6 वर्षापासून गजाननराव जोशी व नारायणराव मारूळकर यांच्याकडून गायन शिकण्यास सुरुवात केली होती. त्यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिन वादक होते. त्यासह ते घरीदेखील व्हॉयोलिननचे वर्ग घ्यायचे.

प्रभाकर जोग त्यांच्या आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेत मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी व्हॉयलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपये आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम सुरु केले होते. गीतरामायणाच्या सुमारे 500 कार्यक्रमांना जोग यांची साथ होती.

1952 साली जोग हे हिंदी चित्रपटसृष्टीत साँग व्हायो लिनिस्ट म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देववर्मन या संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी पुढे काम केले.

प्रभाकर जोग यांनी मिळालेले पुरस्कार

  • पुण्याच्या भारत गायन समाजातर्फ 2013 साली त्यांना वसुंधरा पंडित पुरस्कार मिळाला
  • महाराष्ट्र सरकारतर्फे 2015 साली त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला
  • कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ‘सुरसिंगार’ पुरस्कार मिळाला
  • 2017 मध्ये आखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना नेत्रदिपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार मिळाला
  • 2017 साली गदिमा पुरस्कार मिळाला

संगीतातील सुरेल पर्वाची अखेर – खासदार बापट
नादमधूर संगीताची भुरळ पाडणारे संगीतकार प्रभाकर जोग आज आपल्यातून गेले. संगीतातील एक सुरेल पर्व संपलं. अशा भावना खासदार गिरीश बापट यांनी रविवारी व्यक्त केल्या.ते म्हणाले व्हायोलिनच्या माध्यमातून त्यांनी शब्दांना बोलके केले.  त्यांनी वाजविलेली अनेक गाणी,भावगीते रसिकांच्या मनावर कोरली गेली आहेत. साॅन्गव्हायलोनिष्ट म्हणून अनेक गायकांबरोबर त्यांनी जमविलेल्या  मैफिली मराठी रसिक कधीच विसरणार नाहीत. ” शुभंकरोती कल्याणम् ” या सारख्या गाण्यांना चाली देऊन जोगसाहेब मराठी माणसांच्या घरातच नव्हे तर हृदयात विराजमान झाले आहेत. एक सुरेल पर्व संपलं. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...