नाशिक- आपल्या गायणाच्या जोरावर मुंबई, पुणे, दिल्ली ते थेट अमेरीकेपर्यंत मजल मारलेल्या नाशिकच्या गीता माळी(वय 40) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. गीता माळी या मागील दिड महिन्यांपासून अमेरीकेत कार्यक्रमानिमित्ती गेल्या होत्या.
गायणाच्या कलेने नाशिकसह मुंबई, पुणे, दिल्ली आणि थेट अमेरीकेत ठसा उमटवलेल्या मूळ नाशिकच्या गीता माळी यांचा अपघातात मृत्या झाला. मागील दिड महिन्यांपासून त्या अमेरीकेत कार्यक्रमासाठी गेल्या होत्या त्या आज सकाळी भारतात परतल्या. त्यांचे पती विजय माळी त्यांना घेण्यासाठी मुंबईला गेले होते. विजय माळी हे स्वतः होंडा सिटी गाडी चालवत होते. नाशिकला येत असताना शहापूरजवळ त्यांचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट डिव्हाडर तोडून समोर असलेल्या आईलच्या टँकरवर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा काही भाग गाडीचा काच तोडून आत शिरला आणि गीता माळी यांच्या शरीरात घुसला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती विजय माळी गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे.