19.84 कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस

Date:

मुंबई, 31 मार्च 2022

नवी मुंबईच्या सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर  आयुक्तालयाने  19 कोटी 84 लाख रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघड केला. या प्रकरणी मे. फॉर्च्युन ग्लोबल ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. सिंथेटिक रबरचा व्यापार करणाऱ्या या विक्रोळी स्थित खासगी कंपनीने 110 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून बेकायदेशीररीत्या इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविले आणि त्याचा वापर केला.

मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या प्रधान मुख्य  आयुक्त कार्यालयाच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयातील कर चुकवेगिरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपरोक्त कंपनीविरुद्ध चौकशी सुरु केली. त्यातून असे दिसून आले की या कंपनीने अस्तित्वात नसलेल्या 8 कंपन्यांच्या नावाच्या खोट्या पावत्यांचा वापर करून प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवा न पुरवता फसवणुकीने 9 कोटी 92 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवले आहे किंवा इतरांना दिले आहे.

सीजीएसटी कायदा 2017 मधील  कलम 69 अंतर्गत, कलम 132(1) (ब)आणि (क) अंतर्गत या प्रकरणातील आरोपीला अटक करून आज 31 मार्च 2022 रोजी वाशीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि  त्याला 13 एप्रिल 2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने कर-चुकवेगिरीविरुद्ध सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे.  प्रामाणिक तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या करदात्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्धेला तोंड द्यायला लावून आणि बनावट पावत्या जारी करून सरकारचा देय महसूल बुडवून कर-चुकवेगिरी करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मोहिमेत कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेचा भाग म्हणून केलेल्या कारवाईत, सीजीएसटी नवी मुंबई आयुक्तालयाने  आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये 500 कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील 20 कोटी रुपये वसूल केले तसेच या संदर्भात 14 व्यक्तींना अटकदेखील केली.

अशाच प्रकारच्या आणखी एका प्रकरणात, ठाणे ग्रामीण सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी ठाणेस्थित मे.मोटेक ट्रेडर्स या कंपनीने केलेल्या 176 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्यामध्ये गुंतलेल्या एका जीएसटी व्यावसायिकाला अटक केली. या आरोपीला 30 मार्च 2022 रोजी अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी करण्यात आलेली ही तिसरी अटक आहे.

सीजीएसटी विभागाचे अधिकारी कर चुकवेगिरी करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी डेटा विश्लेषणासारख्या साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण यांचा वापर करून मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सात महिन्यांत 1170 हून अधिक गुन्हे दाखल केले, 7400 कोटी रुपयांच्या कर चुकवेगिरीची प्रकरणे शोधली, 875 कोटी रुपये वसूल केले तसेच  67 व्यक्तींना अटक देखील केली. सीजीएसटी विभाग येत्या आर्थिक वर्षातदेखील प्रामाणिक करदात्यांना चुकीच्या स्पर्धेला तोंड द्यायला लावणाऱ्या आणि सरकारचा अधिकार असलेला महसूल बुडवून कर चुकवेगिरी करणाऱ्या तसेच आयटीसीबाबत फसवणूक करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...