मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानाचा निषेध केला. आणि अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहुल गांधींना , कॉंग्रेसला पाठिंबा देणार का?, असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अवमान सुरू आहे. राहुल गांधींना काँग्रेसच नाही तर भारतीयांचाही इतिहास माहिती नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
स्वा. सावरकरांबद्दल राहुल गांधी सात्यत्याने बोलत आहे. स्वा.सावरकरांना काँग्रेसने वारंवार अपमानीत करण्याचे काम केले. याचे कारण आहे की, सावरकरांच्या मागे देशातील जनता मोठ्या प्रमाणात होती. स्वातंत्र्यानंतरच्या राजकीसय परिस्थितीत जाणीवपूर्वक त्यांना अपमानित करण्यात आले. काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे अगदी कमी लोक होते. सावरकरांनी अनेक क्रांतीकारकांना मोठी प्रेरणा देत अनेक क्रांती कारकांना मोठे केले होते. मात्र राहुल गांधी त्यांचा अपमान करतात कारण त्यांना सावरकरांचा आणि देशाचा इतिहास माहिती नाही म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणार की, भारत जोडो यात्रेला येणाऱ्या राहुल गांधींच्या स्वागतासाठी आपल्या कार्यकर्त्यांना पाठविणार असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन उद्धव ठाकरे करणार का याचे उत्तर त्यांनी द्यावे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीयांच्या मनात सावरकरांकबद्दल असलेली प्रतिमा कधीच मिटू शकणार नाही, राहुल गांधींनी असे कितीही प्रयत्न केले तरी सावरकरांबद्दलचे विचार बदलू शकणरी नाही.
काय म्हणाले होते राहुल?
भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तुमकुर येथे एका 34 मिनिटांच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व PFI पासून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणापर्यंत सर्वच मुद्यांवर उहापोह केला.भारताच्या फाळणीविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले – स्वातंत्र्ययुद्धात सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते. त्यांना इंग्रजांकडून त्याचा मोबदलाही मिळत होता. काँग्रेस खासदार म्हणाले -देशाची जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त असून, सरकार हे मॅनेज करण्यासाठी माध्यमांना नियंत्रित करत आहे.

