पुणे- कमी वेळेपुरती उद्याने उघडली गेल्याने तिथे गर्दी होते अशी तक्रार करत सर्व उद्याने पूर्ण वेळ खुली करा हि नगरसेवक आदित्य माळवे यांची अंशतः मान्य करण्यात आली आहे. या संदर्भात आज महापौरांनी उद्यानांची वेळ वाढविली असल्याची घोषणा केली आहे.
हि घोषणा करताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे कि ,’आपल्या पुणे महानगरपालिकेची उद्याने खुली ठेवण्याची वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून नव्या वेळेनुसार उद्यापासून उद्याने सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. उद्यानांमध्ये वावरताना नागरिकांनी नियम पाळावेत आणि सुरक्षित राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


