पुणे-अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, देशभरातील संशोधन संस्थांच्या कार्यासह देशातील पारंपरिक ज्ञानाची ओळख करून देणाऱ्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या एक्स्पोचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या “व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झाले. त्यानंतर येथील प्रदर्शनास प्रारंभ झाला . फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. 14) सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात डीआरडीओ’ने विकसित केलेली पिनाका, ब्राम्होस, आकाश, अॅस्ट्रा, पृथ्वी, नाग अशी भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे; तसेच, अॅसाल्ट रायफल, कार्बनाइड शॉट गन वेपन सिस्टिम्स, कारबाइन बॅरल ग्रेनेड लाँचर अशा बंदुका पाहता येणार आहेत. तसेच भारतातील पारंपरिक व्यवसायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण हे प्रदर्शनाचे आकर्षण आहे

