कात्रज नवा बोगदा ते नवले पूल आणि परिसरातील अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल आठवडाभरात ! (व्हिडीओ)

Date:

पुणे- कात्रज नवा बोगदा ते नवले पूल आणि परिसरातील अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल आठवडाभरात सादर करावा असे निर्देश आज प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी येथे दिली

नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठीच्या नजीकच्या काळातील आणि दीर्घकालीन उपाययोजनांसंदर्भात आज महापालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासमवेत महत्त्वाची बैठक घेतली. यात तीव्र उतार कमी करणे, सीसीटीव्ही बसवणे, लेन कटिंगवर कारवाई करणे, जोड रस्ते कमी करणे, सर्व्हिस रोडमध्ये सलगता आणणे, आवश्यकता भासल्यास पुलाची/ग्रेड सेपरेटर यासह विविध बाबींवर चर्चा झाली. शिवाय याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी तज्ञांकडून सर्वंकष आढावा घेऊन येत्या आठवड्याभरात सविस्तर अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला असून सदर अहवाल केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन देण्यात येणार आहे.महापौर मुरलीधर मोहोळ ,सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्ष नेत्या दीपालीताई धुमाळ,उपमहापौर सुनीता वाडेकर, पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. सुहास चिटणीस,महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला, पोलीस वाहतूक उपायुक्त डॉ. राहुल श्रीरामे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...