कथक मधून मनोहारी नृत्यरचनांची पुणेकरांना अनुभूती

Date:

नृत्यगुरु शमा भाटे व नादरुप संस्थेतर्फे सादरीकरण  व युवा शाहीर होनराज मावळे यांचा ‘गर्जली स्वातंत्र्य शाहिरी’ हा पोवाडयांचा कार्यक्रम ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ व्या  वर्धापनपदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सव

पुणे :  शिव शिव शिव… या डमरू, चंद्र, गंगा धारणा केलेल्या शिवाची स्तुती असलेल्या नृत्याविष्काराच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. शिवाष्टक, वसंत रागातील तराणा यातून कथकचे विविध अविष्कार रसिकांनी अनुभविले. नृत्य नृत्यगुरु शमा भाटे व नादरुप संस्थेतील नृत्यांगनांनी श्री राम लल्ला या कथक नृत्याविष्कारातून पुणेकरांची  मने जिंकली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात युवा शाहीर होनराज मावळे यांचा ‘गर्जली स्वातंत्र्य शाहिरी’ हा कार्यक्रम पहिल्या सत्रात पार पडला. तर, नृत्यगुरु शमा भाटे व नादरुप संस्थेतर्फे श्री राम लल्ला कथक नृत्याविष्कार हा कार्यक्रम दुस-या सत्रात झाला. 

देश रागातील सादर झालेला चतरंग ही रचना सादर होताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. तसेच रामानवमीनिमित्त नव्याने बसविलेल्या नृत्याचे सादरीकरण प्रथमच या रंगमंचावर झाले. त्यामध्ये रामायणातील विविध प्रसंग… प्रभू रामचंद्राच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारे कथक नृत्याविष्कार सादर झाले.  

पहिल्या सत्रात ‘गर्जली स्वातंत्र्य शाहिरी’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘भारतभूला गौरविण्यात, शब्द  स्वरांची गुंफली माला…’ या स्वातंत्र्यगणाने झाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘म-हाठ मोळ्या शिवरायांच्या पावनभूमीवरी…’ या  मुज-यातून शिवरायांपासून ते शेतकरी – कामक-यांपर्यंत प्रत्येकाचे समाजाप्रती केलेल्या योगदानाचे वर्णन करण्यात आले. सन १८५७ चे स्वातंत्र्यसमर, तात्या टोपे, झाशीची राणी, लोकमान्य टिळकांचे योगदान देखील पोवाड्यातून युवा शाहिरांनी मांडले. स्वराज्य पुरुष लोकमान्य टिळकांचे योगदान पोवाड्यातून ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मोहन शेटे यांनी निवेदन केले. 

गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...