पुणे -शहर युवक काँग्रेसतर्फे भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. छायाचित्र प्रदर्शनात सुमारे १४० फोटोंचा समावेश आहे. राजीव गांधी यांच्या जन्म दाखला पासून ते शेवट पर्यंतचे सर्व छायाचित्र या प्रदर्शनात समावेश आहेत. प्रदर्शनातील सर्व छायाचित्र संकलन जेष्ठ फोटोग्राफर सुशिल राठोड यांनी गेले ३५ वर्षापासून संकलित केले आहेत. याप्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, युवक अध्यक्ष विशाल मलके आदी उपस्थित होते.


