पुणे दि.25 – मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. लोकशाही आणखी सशक्त होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे, तसेच नवमतदारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, 25 जानेवारी 1950 भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस. या दिनानिमित्त संपूर्ण देशात 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. 2011 पासून हा दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी करावी आणि प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा हा भारत निवडणूक आयोगाचा संकल्प आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी आणि मतदान करावे. भारत निवडणूक आयोगाकडून या वर्षाच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे घोषवाक्य सर्व मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक बनविण्यासाठी कटिबदध असे आहे. नवमतदारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक- युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करावी. दिव्यांग व वृध्द व्यक्तींना मतदानासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, लोकशाही समृध्द होण्यासाठी नवमतदारांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी राष्ट्री य मतदार दिनानिमित्त जिल्हयातील मतदान केंद्रावर मतदान नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून दिव्यांग तसेच नवमतदारांसाठी ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख आणि मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी मतदान हक्क बजावण्याबाबत आणि लोकशाही बळकटीकरणाबाबतची प्रतिज्ञा दिली. निवडणूकीत उत्कृष्ट कार्य करणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उत्कृष्ट पर्यवेक्षक यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले, आभार नायब तहसीलदार प्रकाश वटकर यांनी मानले. यावेळी नवमतदार, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्कृष्ट बीएलओंचा(मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) गौरव
नायब तहसीलदार अंकुश कांबळे, मंडळ अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला,लिपीक संजय अहिरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे संतोष मोरे, चंद्रकांत खंडागळे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री. राजेंद्र दत्तात्रय पापडे, श्री. दिपक यशवंतराव हरण, श्री. आर.एम.नाईकरे, श्री. एन.डी. सुरडकर, श्री. बन्सीलाल शिंदे, श्रीमती. शुभांगी अनिल शिंदे, श्री. महेश विठ्ठल मेटे, श्री. राजेंद्र विष्णू खंडागळे, श्री. मनोज लक्ष्मण जगताप, श्री. गोरक्षनाथ भगवान लडकत, श्री. सुरेश बा. बढे, श्री. गणेश शेंडगे, श्री. रोकडे प्रणव, श्री. रुपिकांत निवृत्ती वचकल, श्री. विजय बाळकृष्ण जाधव, श्री. ज्ञानेश्वर भुजबळ, श्री. मनोजकुमार दौलतराव कदम, श्री. सचिन भुजबळ, श्री. अतुल शिवाजी वाघचौरे, श्री. निलेश बांदल, श्री. रमेश कान्हु बिरदवडे, श्री. साजीद शब्बीर काझी, श्री. नितीन पदे तसेच पर्यवेक्षक श्री. दादासाहेब बबन काळे, श्री. एकनाथ महादेव ढाके, श्री. दिनेश दाकडे, श्रीमती मनिषा खैरे, श्री. विनोद सिताराम धांडोरे, श्री. मकरंद सोनाबा तांबडे, श्री. आर.डी. पारधी, श्री. एस.एस.किरकोळे, श्री. विजयकुमार थोपटे, श्री. दिपक भिकोबा नलावडे, श्री. छल्लारे केतन, श्री. विजय सदानंद मारणे, श्रीमती अत्तार रेहाना पिरमहंमद, श्री. राजेंद्र कुंडलिक लांडगे, श्री. अंभेरे विलास कृष्णा, श्री. सुनिल भोसले, श्री. किशोर कापसे, श्रीमती सुनिता सुदाम जोगदंड, श्रीमती सुकेशिनी कोले, श्री. रोहिदास तुपसौदर, श्रीमती तेजस्विनी गदादे, श्री. बाळासाहेब चव्हाण, श्री. सुनील माने यांचा विशेष कामगिरीबाबत गौरव करण्यात आला.

