मंत्र्यांसोबत तरुणीचे फोटो प्रसिद्ध होऊनही अद्यापही कारवाई का नाही ?- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील

Date:

मुंबई, दि. 23. तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असलेले व लपून बसेलले राज्य सरकारमधील एक मंत्री आज 15 दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिदधी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली . विशेष म्हणजे आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्या केलेल्या तरुणी सोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, मग अद्यापही या मंत्र्यांविरुध्द ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही असा रोखठोक सवाल भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित केला आहे.
त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होणे बाकी आहे ? राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे. राज्य सरकार त्या प्रकरणावर  कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे ? असे सवालही दादा पाटील यांनी उपस्थित केले आहेत. सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली असल्याची टीका करताना ते म्हणाले की, या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत ?  महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण तुमच्याकडून अपेक्षित असताना तुम्ही आपल्याच मंत्रीमंडळातील एका आरोपीला वाचवत असल्याचा आरोप करतानाच दादा पाटील यांनी स्पष्ट केले की, त्या तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...