आंबील ओढा सीमाभिंतीचा ठराव मान्यतेनंतरही ४५ दिवस स्थायी समितीमध्ये पडून..’गौडबंगाल ‘ काय ?

Date:

राष्ट्रवादी च्या नितीन कदमांचा सवाल

२५ सप्टेबरला म्हणजे उदया आंबील ओढा दुर्घटनेला एक वर्ष

पुणे:राष्ट्रवादी कॉंग्रेस,पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम म्हणाले ,’पुणेकर २५ सप्टेबर २०१९ चा काळाकुट दिवस विसरलेले नाही. याच दिवशी अतीवृष्टीमुळे कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, सहकारनगरमधील नागरीकांचे प्रचंड नुकसान केले. सुमारे दहा लोकांना आपले प्राण गमवावे लागले. शेकडो लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक लोक रस्त्यावर आले. त्यातून अजूनही लोक सावरलेले नाहीत.येत्या २५ सप्टेबरला म्हणजे उदया आंबील ओढा दुर्घटनेला एक वर्ष होत आहे. गेल्या वर्षभरात सत्ताधारी भाजपने दिलेल्या आश्वासने पुराच्या पाण्यासारखी वाहून गेली आहेत. त्यातच आता मलनिस्सारण खात्याकडून माहिती घेता असे समजते की गेल्या ४५ दिवसांपूर्वी आंबील ओढा सिंमा भिंत बांधण्याचा ठराव स्थायी समितीने मान्य केला परंतु त्यावर अध्यक्षांची सही न झाल्यामुळे तो खात्यास प्राप्त झालेला नाही. त्याची वर्क ऑर्डर अजूनही ठेकेदाराला देण्यात आलेली नाही. त्यामुळे काम सुरु झालेले नाही. काय हे पुणेकरांचे दुर्दैव,वास्तविक ठराव मान्य झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष सही करतात आणि तो संबंधीत खात्याकडे पाठवण्यात येतो. त्यानंतर ठेकेदाराला कामाची वर्क ऑर्डर देण्यात येते. परंतु तब्बल दिड महिन्यांनंतरही ठराव स्थायी समितीमध्ये सही साठी पडून आहे. यामागे काय गौडबंगाल आहे हे कळत नाही,

स्थायी समिती अजूनही दुसऱ्या दुर्घटनेची वाट पहात आहे असे दिसते आहे. दुसरीकडे मात्र भाबडे स्थानिक नागरिक सिंमा भिंत बांधून आपल्याला पुन्हा त्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही अशी आशा बाळगत आहेत. त्यात जनतेचा काहीच दोष नाही. कारण त्यांनीच भाजपला सत्ता दिली आहे आणि आपली सुरक्षितता त्यांच्या दावणीला बांधली आहे. त्याची परतफेड भाजप महिना-महिनाभर जनतेच्या सुरक्षिततेच्या ठरावावर आणि जनतेच्या पैशांवर नागोबासारखे ठाण मांडून करीत आहे. असेही नितीन कदम यांनी ‘माय मराठी’कडे भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...