पुणे- ज्येष्ठ नागरिकाच्या डेंग्यूने मृत्यूनंतरही महापालिकेने काहीही हालचाली न केल्याने महापालिकेला जाग कधी येणार ? असा सवाल करत राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी महापालिका आरोग्यप्रमुख आशिष भारती यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले. याप्रसंगी स्मिता गायकवाड,मीनाताई भोसले,पुनम धोत्रे,गीतांजली बर्गे,रिना सोहाडे,अमर राजपुत,ययाती चरवाड, प्रशांत गांधी, मदन वाणी,स्वप्निल खडके, प्रशांत कदम इत्यादी उपस्थित होते.
नितीन कदम यावेळी म्हणाले,’ पुणे शहरात कोणतीच उपाययोजना कार्यरत नसल्याबाबत..पुणे शहरात केंद्रीय व राज्यआरोग्य विभागाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार कारवाई त्वरित सुरू करा.पुणे शहरात देखील दरवर्षीप्रमाणे डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताना आढळून येतात. नुकतेच दीनानाथ हॉस्पिटल येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे दिसून आले.
त्याचप्रमाणे राज्य सरकार व केंद्र सरकारने डेंग्यू संदर्भात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्गमित केल्या आहेत.
यावेळी त्यांनी केलेल्या मागण्या –
● नियमित सर्वेक्षण (अ) प्रत्यक्ष (ब) अप्रत्यक्ष
● उद्रेकग्रस्त ठिकाणी शीघ्र ताप सर्वेक्षण.
● हिवतापासाठी रक्तनमूने गोळा करणे आणि त्याची तपासणी करणे.
● उद्रेकग्रस्त भागातील संशयित डेंग्यूच्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांचे रक्तजलनमूने सर्वेक्षण रुग्णालयामध्ये विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
● उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी.
● डेंग्यूचा रोगवाहक शोधण्यासाठी (एडीस ईजिप्टाय) किटकशास्त्रीय सर्वेक्षण करावे.
● भांडी तपासणी सर्वेक्षण करुन घर निर्देशांक (हाऊस इंडेक्स) व ब्रॅटयू निर्देशांक (ब्रॅटयू इंडेक्स) काढणे.
● ज्या ठिकाणी एडीसच्या अळया आढळून आलेल्या आहेत ती सर्व जागा रिकामी करणे.
● जी जागा रिकामी करण्यायोग्य नाहीत अशा ठिकाणी टेमिफॉस अळीनाशक टाकणे.
● आरोग्य शिक्षण