रामनदीच्या पुनर्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा – आ. चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे-रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण करुन, त्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. रामनदीच्या पुनरुजजीवना संदर्भात आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधीला प्राधिकरणावर निमंत्रित सदस्य करावे अशी सूचना ही त्यांनी यावेळी केली.
यावेळी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर,अधीक्षक अभियंता ( बांधकाम )युवराज देशमुख,कोथरुड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, यांच्यासह रामनदी पुनर्जीवनासाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.यात प्रामुख्याने वीरेंद्र चित्राव,अनिल गायकवाड,शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर,डॉ. सचिन पुणेकर, सुवर्णा भांबूरकर,नयनीश देशपांडे,ज्योती पानसे, निनाद पाटील,वैशाली पाटकर, जयप्रकाश पराडकर,तुषार सरोदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामनदीचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करणे आणि प्राधिकरणात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीला निमंत्रित सदस्य करण्याच्या मागणीला आयुक्त विक्रम कुमार यांनी तात्काळ मान्यता दिली. रामनदीच्या पुनरुज्जीवनासोबतच मुळा-मुठा नदीचा विकास करण्यात येणार असून,यामध्ये मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण, खोलीकरण आणि विकासासाठी स्वतंत्र १७०० कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असून महापौर त्याचे अध्यक्ष असल्याची माहिती आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...