समाजामध्ये समता निर्माण होऊन उच्च – नीच भाव दूर व्हावा:विहिंपचे केंद्रीय कार्याध्यक्ष ॲड. आलोककुमार 

Date:

विश्व हिंदू परिषद पूर्व व पश्चिम विभाग पुणे तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव
पुणे : अयोध्येमध्ये श्रीरामांचे मंदिर उभारले जात आहे. त्याचवेळी  प्रत्येकाच्या हृदयात समरसता निर्माण व्हायला हवी. आपल्या मनातील उच्च – नीच हा भाव दूर झाला पाहिजे. देशातील कोणताही एक समाज जरी आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य याबाबत मागे राहिला तरी समता येणार नाही, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष ॲड. आलोककुमार यांनी व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषदेच्या पूर्व आणि पश्चिम पुणे विभागातर्फे सामाजिक समरसता अभियान अंतर्गत महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कविराज संघेलिया, ईश्वर बुवा दादा महाराज, बापू भोळे, विजय कांबळे, निखील कुलकर्णी उपस्थित होते.

ॲड. आलोककुमार म्हणाले, समरसता म्हणजे काय तर सर्व मनुष्यामध्ये भगवंत निवास करतो, अशी भावना ठेवणे. संपूर्ण समाजामध्ये ब्रह्म पाहण्याचा अभ्यास म्हणजे समरसता. हिंदू समाजाला आणि देशाला बलशाली बनविण्यासाठी सामाजिक समरसता हे अभियान राबविण्यात येत आहे. येत्या काळात भारत देश विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणून ओळखला जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

समरसतेचा आवाज देशाच्या प्रगतीसाठी असेल. हिंदू समाजातील तरुणांनी रोजगार निर्माण करणारे व्हा, असेही त्यांनी सांगितले. कविराज संघेलीया, ईश्वर बुवा दादा महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. नाना क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष अनगोळकर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...