राज्यातील वेटलँडच्या जतन आणि संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Date:

  • महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणाची बैठक संपन्न.

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणाची बैठक आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. राज्यातील ‘नॉट वेटलँड’ म्हणून पडताळणी झालेल्या साईटस् ची पुन्हा पडताळणी करण्यात यावी, वेटलँडस् च्या जतन आणि संवर्धनाचा समावेश माझी वसुंधरा अभियानात करण्यात यावा, तसेच याबाबत संबंधीत कर्मचाऱ्यांची विभागस्तरावर कार्यशाळा घेण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव तथा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा श्रीमती मनिषा म्हैसकर, पर्यावरण संचालक श्री. नरेद्र टोके, पर्यावरण विभागाचे उपसचिव जॉय ठाकूर उपस्थित होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवन संरक्षणाचा मुद्दा राज्य शासनाने अग्रक्रमावर घेतला आहे. त्याच पद्धतीने राज्यातील वेटलँडस् चे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक असून यासाठी हा मुद्दाही अग्रक्रमावर घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येईल. ‘नॉट वेटलँड’ म्हणून पडताळणी झालेल्या सर्व साईटस् ची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वेटलँडमध्ये कोणत्या साईटचा अंतर्भाव करावा याबाबत स्पष्टता येण्यासाठी तसेच याबाबत प्रबोधन आणि मार्गदर्शन होण्याच्या अनुषंगाने या विषयाशी संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, असेही मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवाय पर्यावरण जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये वेटलँड जतन आणि संवर्धनाचा मुद्दाही समाविष्ट करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...