Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘स्टोरीटेल’वर ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या आता ११ भारतीय भाषांमध्ये!

Date:

भारतातील विविध भाषांमधील ऑडिओबुक्सची मागणी आणि आवड बघता स्टोरीटेलने आता श्रोत्यांसाठी ११ भारतीय भाषांमधील एक विशेष सबस्क्रीप्शन प्लॅन उपलब्ध करून दिला आहे.सिलेक्ट असे या प्लॅनचे नाव असून यात आपल्याला ११ स्थानिक भारतीय भाषांमधील ऑडिओबुक्स ऐकता येणार आहेत.

याआधी फक्त मराठी भाषेसाठी सिलेक्ट प्लॅन उपलब्ध करण्यात आला होता. यात सर्व मराठी ऑडिओबुक व ईबुकचा समावेश होता. या प्लॅनला विशेष यशही मिळाले. या यशानंतर आता हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, आसामी, गुजराती, ओडिसी आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमधील विविध ऑडिओबुक्स तुम्हाला दरमहा १४९/- रूपयांमध्ये उपलब्ध होतील.

स्टोरीटलच्या ग्राहकांना आता सबस्क्रीप्शनचे अनलिमिटेड आणि सिलेक्ट असे दोन पर्याय उपलब्ध होतील.‘सिलेक्ट’योजनेतदरमहा फक्त १४९ रूपयांत ११ भाषांतील हजारो पुस्तके ऐकता येतील. तर, ‘अनलिमिटेड’योजनेत फक्त २९९ रूपयांत ११ भारतीय भाषांतील आणि आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेतील दोन लाखांहून अधिक अभिजात पुस्तकेही ऐकायला मिळतील. ग्राहक यातील आपल्याला हवा तो पर्याय निवडू शकतात व ऑडिओबुक्स ऐकण्याचा अमर्याद आनंद घेऊ शकतात.

पुस्तकप्रेमी व साहित्यप्रेमी श्रोत्यांना स्टोरीटेलवर दिग्गज लेखकांचे अभिजात साहित्य ऐकायला मिळेल. यात ज्येष्ठ लेखकांपासून ते प्रतिथयश व नवोदित लेखकांनी लिहिलेल्या दर्जेदार कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. पु. ल. देशपांडे, सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरी, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे अशा मराठीतील मान्यवर साहित्यिकांच्या लेखकांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या कलाकृती श्रोत्यांना या ‘सिलेक्ट” मध्ये ऐकता येतील. मृत्यूंजय, युगंधर, छावा, निवडक पुलं असं अभिजात साहित्य स्टोरीटेलवर अतिशय लोकप्रिय आहेत. याशिवाय नव्या पिढीतील लेखकांची लोकप्रियओरिजिनल ऑडिओ बुक्सही यात ऐकता येतील.ही ऑडिओबुक्स लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, संदीप खरे, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, अतुल पेठे, उदय सबनीस आदि  नामवंतांनी वाचली आहेत.

स्टोरीटेल सिलेक्ट हा स्टोरीटेलच्या प्रवासामधील महत्त्वाचा टप्पा आहे. रसिकश्रोत्यांना जे आवडतं आणि ऐकायचं आहे, तेच देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सिलेक्टच्या माध्यमातून  आम्ही रसिकश्रोत्यांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

लोकांना साहित्याची आणि कथांची गोडी निर्माण व्हावी हे आमचे ध्येय आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीचा पर्याय निवडता यावा यासाठी आम्ही सिलेक्टची सुरवात करत आहोत. आमच्या पाहण्यात आले की, इंग्रजीशिवाय भारतातील इतर भाषांमधील ऑडिओबुक्सही लोक मोठ्या प्रमाणात ऐकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेतील ऑडिओबुक्स अत्यंत माफक दरात आम्ही उलब्ध करून देत आहोत, अशी माहिती स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी सांगितले.

स्टोरीटेल गुगल प्ले तसेच अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

स्टोरीटेल विषयी…

स्टोरीटेल ही उत्तर युरोपातील ऑडिओ बुक व ई-बुक सेवा देणारी अग्रगण्य कंपनी आहे. या अॅपद्वारे वेगवेगळ्या भाषांतील जवळपास ५ लाखांहून अधिक पुस्तके ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.कोणासही,कोठूनही आणि केव्हाही कोणीही शेअर केलेली पुस्तके वाचता यायला हवी,त्यामुळे जग समानुभूतीने आणखी जवळ येईल हे स्टोरीटेलचे ध्येय आहे. स्टोरीटेल हे एक डिजिटल व्यासपीठ आहे तसेच ती एक मोठी प्रकाशन संस्थाही आहे. स्ट्रीमिंग व्यवसाय क्षेत्रात स्टोरीटेल आणि मोफिबो ब्रँड अंतर्गत ऑडिओबुक आणि ई-बुकसाठी सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.डिजिटल-रीड-ऑल-कॅन स्ट्रीमिंग सेवा ही वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी जानेवारी 2019 पासून स्टोरीटेलचा भाग आहे. स्टोरीटेल जगभरातील 20 देशांत कार्यरत असून त्याचे मुख्यालय स्टॉकहोम,स्वीडन येथे आहे. अधिक माहितीसाठी https://www.storytel.com या वेबला भेट द्या 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...

सायली संजीवच्या दमदार अभिनयासह ‘कैरी’चा यशस्वी प्रीमियर

भावना, थरार आणि निसर्गसौंदर्याचा संगम—‘कैरी’चा भव्य प्रीमियर बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट...

बनावट औषध निर्मिती:सदाशिवपेठेत छापा- अक्षय पुनिया,अमृत जैन,मनिष जैन,रोहित नावडकरसह देशभरातील ८ जणांवर गुन्हा दाखल

सिक्कीमच्या औषध कंपनीच्या नावाने बनावट औषधनिर्मिती:बिहारमधील मुदतबाह्य परवान्याचा गैरवापर,...

कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर

भारतामधील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे अग्रणी स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडने त्यांचा अपडेटेड ड्राफ्ट...