उच्चांकी मागणीएवढा अखंडित वीजपुरवठा

Date:

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरण, महानिर्मितीचे कौतुक

मुंबई, दि. २८ एप्रिल २०२२: कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये १५ राज्यांत भारनियमन होत असताना महाराष्ट्रात आठवडापासून अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे गेल्या शुक्रवारपासून राज्यात कुठेही भारनियमन करण्याची वेळ आली नाही. ही परिस्थिती गुरुवारीही (२८ एप्रिल) कायम होती.  या कामगिरीसाठी  ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी  महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे कौतुक केले आहे.

    कोळसा टंचाईसह विविध कारणांमुळे वीजसंकट गडद झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांना भारनियमन करावे लागले आहे. मात्र महाराष्ट्रातील विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून विविध  स्रोत  व वीज निर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही क्षणाला विजेची तूट निर्माण होत असल्याची स्थिती दिसून येताच पर्यायी वीज उपलब्ध करून भारनियमन टाळण्यात महावितरणला यश येत आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून (दि. २२) गुरुवारपर्यंत (दि. २८) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. गुरुवारी मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने २४ हजार ७ मेगावॅट या आजपर्यंतच्या सर्वोच्च मागणीइतका वीजपुरवठा केला.

     ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी या कामगिरीबद्दल प्रधान सचिव (ऊर्जा) श्री.दिनेश वाघमारे व  महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांचे कौतुक केले आहे. तसेच महानिर्मितीनेही राज्यातील सर्व २७ संच कार्यान्वित करून वीजनिर्मिती वाढवली आणि अखंडित वीजपुरवठ्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना साथ दिली. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.संजय खंदारे यांचेही कौतुक केले आहे.

  महावितरणची गुरुवारी दुपारी ४ वाजता २४ हजार ७ मेगावॅट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक व गॅस प्रकल्पांतून ७६७९ मेगावॅट, केंद्राकडून ५४३४ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून १४३० मेगावॅट, अदानीकडून २९८३ मेगावॅट, रतन इंडियाकडून १२०० मेगावॅट,  बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १४०२ मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १०९२ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून ४६० मेगावॅट, एम्को १९४ मेगावॅट, सीजीपीएल ७३५ मेगावॅट, साई वर्धा १५१ मेगावॅट, सहवीज निर्मितीतून ९०५, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून ३४२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता आला. येत्या काळात सुद्धा ही परिस्थिती कायम राहील यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...