पुणे-दिवा पेजंट्स’चे संचालक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘एम्प्रेस ऑफ पुणे 2022’ ही सर्वोत्कृष्ट सौंदर्य स्पर्धा नुकतीच पुण्यात दिमाखात संपन्न झाली. यंदा या स्पर्धेत मिस व मिसेस या श्रेणींमध्ये ३० अंतिम स्पर्धकांनी आपली बुद्धिमत्ता तथा सौंदर्याचा आविष्कार घडवला. ही महाअंतिम फेरी हयात रीजेन्सी पुणे (आतिथ्य प्रायोजक) येथे पार पडली. कार्यक्रमाचे सादरीकरण विनय अरान्हा यांनी ‘कॉस्मेटोप्लास्ट’च्या सहकार्याने केले.
‘दिवा’ने या स्पर्धकांची उत्कृष्ट तयारी करुन घेतली होती. अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली त्यांना स्वपरिचय फेरी, आवाजातील चढउतार, रंगमंचावरील वावर, प्रश्नोत्तर सत्र अशा कौशल्यांत पारंगत करण्यात आले.
परीक्षक मंडळात प्रसिद्ध चित्रपट तारे तथा नामवंतांचा समावेश होता. त्यात विनय अरान्हा (रोझरी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक), डॉ. विक्रमादित्य साळवी (कॉस्मेटोप्लास्टचे व्यवस्थापकीय संचालक), दीपशिखा नागपाल (अभिनेत्री), दीप्ती चाको बांगेरा (मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन २०२१ – प्लस विजेत्या), डॉ. फर्झाना लकडावाला (मिसेस महाराष्ट्र २०२१ सेकंड रनर अप) आणि कार्ल मस्कारेन्हास (दिवाचे संचालक) यांनी सहकार्य दिले.
आंतरराष्ट्रीय सूत्रसंचालक व गायिका दिलरुबा पांडे यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकवृंदाला मंत्रमुग्ध केले.
मिसेस श्रेणीतील विजेते :
– मिताली करंदीकर – विजेत्या
– प्रियांका गादिया – फर्स्ट रनर अप
– दीपाक्षी श्रिंगारे – सेकंड रनर अप
मिस श्रेणीतील विजेते :
– लावण्या पाटी – विजेत्या
– अंजली बावस्कर – फर्स्ट रनर अप
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन व नृत्य संयोजन केले. त्यांना मृणाली तायडे व अश्विनी नलावडे यांची प्रभावी साथ लाभली.
पुण्याची सर्वोत्कृष्ट दर्जाची सौंदर्य स्पर्धा ठरलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित असेल्या सर्वांना डेअर*ड्रीम*डॅझल (धाडस करा-स्वप्न पाहा-स्तिमित करा) ही प्रेरणा दिली.