पुणे: महावितरणच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये क्रिकेट, रांगोळी स्पर्धा तसेच स्नेहमेळा व शैक्षणिक प्राविण्य मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आयोजनामुळे नवी ऊर्जा मिळाली.
महावितरणच्या वर्धापनदिनानिमित्त रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेहमेळा-२०२२ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश राजदीप, डॉ. सुरेश वानखेडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाद्वारे स्नेहमेळ्याचे उद्घाटन झाले.
दरम्यान दि. ४ ते ५ जून रोजी पुणे परिमंडल अंतर्गत विभागस्तरीय पुरुष व मंडलस्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत मंचर विभागाच्या पुरुष संघाने व रास्तापेठ मंडलाच्या महिला संघाने विजेतेपद पटकाविले तर बंडगार्डन विभागाचा पुरुष संघ व गणेशखिंड मंडलाचा महिला संघ उपविजेता पदाचे मानकरी ठरले. तसेच परिमंडलस्तरीय रांगोळी स्पर्धेत उज्ज्वला सोनार- प्रथम, काजल लिंबोळे- द्वितीय तर अपर्णा मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. स्नेहमेळ्याच्या कार्यक्रमात क्रिकेट स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघांना चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उच्च शिक्षणासाठी आयआयटीमध्ये प्रवेश मिळविणारे शिवम अंकुश नाळे, हेमंत सुरेश वानखडे, ऋषिकेश रवींद्र कारंडे, डेलिया तुषार काळे, सृष्टी श्रीकांत गंगावणे, मयांक देविदत्त जोशी, आर्यन माणिक राठोड तसेच शैक्षणिकसह कला व क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे आदित्य राजेश काळे, प्रद्युम्न्य संजय जगनाडे, सोनल चंद्रकांत कानडे, यश सतीश उंडे आणि एमपीएससी स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी झालेले श्री. नीलेश कृष्णाजी सस्ते यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यानंतर हिंदी व मराठी गाण्यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी, श्री. संतोष गहेरवार, भक्ती जोशी यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब हळनोर यांनी आभार मानले. वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

