औरंगाबाद, 9जुन 2017: ईएमएमटीसी यांच्या तर्फे आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 15000 डॉलर एन्डयुरन्स औरंगाबाद खुल्या महिला आयटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ऋतुजा भोसले, महक जैन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
औरंगाबाद येथील डिव्हीजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गारखेडा येथील टेनिस कोर्टवर स्पर्धेत एकेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या ऋतुजा भोसले हिने रम्या नटराजनचा टायब्रेकमध्ये 6-3,7-6(6) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 1 तास 28 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ऋतुजाने वर्चस्व राखत 5-1 अशी आघाडी घेतली त्यानंतर रम्याने फोरहँडचे फटके लावत सलग दोन गेम जिंकल्या. पण ऋतुजाने स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ऋतुजाने वरचढ खेळ करत सामन्यात 3-0 अशी आघाडी घेतली. मात्र, रम्याने पुनर्रआगमन करत सामन्यात 3-3 अशी बरोबरी साधली. त्यानंतर ऋतूजाने आक्रमक खेळ करत रम्याची सातव्या व नवव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 6-5 अशी स्थिती निर्माण झाली. रम्याने ऋतुजाची 10 व 12 गेममधे सर्व्हिस रोखली व त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 6-5 अशी स्थिती असताना ऋतुजाने तीन गुण मिळवत हा सेट 7-6(6)असा जिंकून विजय मिळवला. यावेळी ऋतुजा म्हणाली की, एमएसएलटीए व एन्डयुरन्स यांनी ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे आणि वाईल्ड कार्ड प्रदान केल्यामुळे मी त्यांची आभारी आहे. या स्पर्धेमुळे मला महत्वपूर्ण गुण मिळविण्यात आणि कोणत्याही दडपणाशिवाय माझे प्रोफेशनल करिअर सुरु करण्यास मदत होणार आहे. तसेच, या स्पर्धेमुळे इतर भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण डब्लूटीए गुण मिळविण्यास मदत होणार आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत 16 वर्षीय महक जैन हिने पाचव्या मानांकित निधी चिलुमुलाचा 6-4,6
दुहेरीत उपांत्य फेरीत ऋतूजा भोसलेने कणिका वैद्यच्या साथीत मनिषा फोस्टर व अॅलेक्झॅंड्रा वॉल्टर्स यांचा 6-1,6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रांजला येडलापल्ली व जिओक्सी झाओ या जोडीने स्नेहादेवी रेड्डी व रिशीका सुंकारा यांचा 7-5,6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्य फेरी: ऋतुजा भोसले(भारत)वि.वि.रम्या नटराजन(भारत)6-3,7-6(6);महक जैन(भारत)वि.वि.निधी चिलुमुला(भा
दुहेरी गट: उपांत्य फेरी: प्रांजला येडलापल्ली/जिओक्सी झाओ वि.वि.स्नेहादेवी रेड्डी/रिशीका सुंकारा 7-5,6-3;
ऋतुजा भोसले/कणिका वैद्य वि.वि.मनिषा फोस्टर/अॅलेक्झॅंड्रा वॉल्टर्स(

