औषधी आणि वैद्यकीय उपकरणांवरील कर हटवा- ममता बॅनर्जी

Date:

कोलकाता-पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोरोना लढाईतील महत्वाचे वैद्यकीय उपकरण, औषधांवरील सर्व प्रकारचे कर आणि कस्टम ड्यूटी माफ करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करत अत्यावश्यक औषधासह ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा वाढवण्याचीही मागणी केली आहे.गेल्या 5 दिवसात पंतप्रधान मोदी यांना दुसरे पत्र लिहून त्यांनी हि मागणी नोंदविली आहे

ममता यांनी या पत्रात पुढे म्हटले की, कोरोनाकाळात लोकांना मदत करण्यासाठी अनेक लोक, संस्था, संघटना पुढे येत असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सिलेंडर, कन्टेनर आणि कोरोनासंबंधी अत्यावश्यक औषधे दान करत आहे. परंतु, अशावेळी लोक संबंधित उपकरणांवरील SGST, CGST, IGST कर माफ करण्याचे विनंती करत असल्याचे ममता यांनी पत्रात म्हटले आहे.

GST किंवा कस्‍टम ड्यूटीपासून मुक्ती करा – ममता
या उपकराणांवरील दर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असून केंद्राने यावरील GST किंवा कस्‍टम ड्यूटी व तत्सम करातून सुट दिली जावी. कारण यामुळे कोविड व्यवस्थापनात महत्वाचे उपकरणे आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा वाढवता येणार असल्याचे ममता यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री होताच ममता यांनी मोदी यांना लिहले होते पत्र
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना कोविड व्यवस्थापनासंदर्भांत पहिले पत्र लिहीले . या पत्रात ममता यांनी राज्यातील मोफत लसीकरणासाठी लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन चा पुरवठा, हॉस्पिटल बेड आण‍ि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा वाढवण्यास सांगितले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...