कात्रज येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु

Date:

पुणे: कात्रज येथील ओंकार सोसायटीमध्ये उच्चदाबाच्या उपरी वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी या १४ वर्षीय बालकाचा उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी सुरु आहे. त्यांचा तांत्रिक निरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून दोषींविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत करण्यात येत आहे.

ओंकार सोसायटीच्या रस्त्याच्या कडेने उच्चदाबाची २२ केव्ही कात्रज-कोंढवा वीजवाहिनी गेली आहे. गेल्या रविवारी (दि. २३) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास या उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेच्या धक्क्याने ऋषिकेश जखमी झाला होता. याबाबत महावितरणच्या पद्मावती विभाग कार्यालयाकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे विद्युत निरीक्षकांनी या जागेची पाहणी केली आहे. त्यांच्याकडून तांत्रिक निरीक्षण अहवाल लवकरच प्राप्त होईल. दरम्यान, महावितरणच्या संबंधित अभियंत्यांनी या जागेची पाहणी केली आहे. यामध्ये उपरी तारमार्ग स्वरुपाची असलेल्या वीजवाहिनीचे रस्त्याच्या बाजूच्या जमिनीपासूनचे अंतर योग्य असल्याचे दिसून आले. वीजवाहिनी असलेल्या ठिकाणच्या रस्त्यालगत १० ते १२ फूट उंच भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीच्या आतील बाजूस भराव टाकल्यामुळे वीजवाहिनीचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाल्याचे निदर्शनास आले. भिंतीच्या आतील परिसर वापरात नसल्याने तेथे झाडेझुडपे वाढलेली आहे. सोसायटीच्या आतील बाजूने ऋषिकेश भिंतीवर गेला असावा व उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसला असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...