Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

मुंबई दि ७: कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

बेस्टच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण, FAME II प्रकल्पातंर्गत 12 मीटर्स लांबीच्या इलेक्ट्रीक बसगाड्या, नवीन वातानुकुलीत बस मार्ग क्र.ए-115 आणि ए-116 तसेच 24 इतर गाड्याचे लोकार्पण श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माहिम पश्चिम बसस्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी.बेलारूस, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, आमदार सदा सरवणकर, नगरसेवक मिलींद वैद्य, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सन 1874 ते 2021 हा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. वेळेनुसार बेस्टमध्ये बदल होत गेला. इलेक्ट्रीक बस प्रदूषण न करणारी व पर्यावरण पूरक बस आहेत. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. आम्ही वचननाम्यात म्हटल्याप्रमाने बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे, असे नियोजन करण्यात येत आहे.कोरोनाकाळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त झाले. काहींचे मृत्यू झाले तरीदेखील बेस्ट थांबली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे बेस्टचे आधुनिकीकरण शक्य होत आहे. यापुढे ई पास सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असून एकाच तिकीटावर अनेक सुविधा मिळणार आहेत.गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलते आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करतो आहोत. कालच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालक भेटून गेले. त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी, अशी विनंती केली. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे. कोरोना उलटणार तर नाही ना हेही पहावे लागणार आहे. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी इलेक्ट्रीक बसच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली. नवीन इलेक्ट्रनिक धोरणानुसार 15 टक्के इलेक्ट्रॉनिक व्हेइकल वाढवण्यात येणार आहेत. मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थापनाविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक ॲप विकसित करण्यात येणार आहे, असेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.

सेवानिवृत्त एक हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या उपदानाचे प्रदान

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान वितरणाचा शुभारंभ श्री.ठाकरे यांच्या हस्ते झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात उपदानाची रक्कम थेट जमा होणार आहे. 1005 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी लागणारी रुपये 94.21 कोटी एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...