एकनाथ शिंदेंना धरा..धरा..त्याला राजीनामा मागा. ..अरे एकनाथ शिंदे तुमच्यासारखे बिल्डरला 350 कोटी रुपये फुकटचे देत नाही

Date:

भूखंड घोटाळा आरोपांवर एकनाथ शिंदे यांचा पलटवार

नागपूर -माझ्यावर आरोप करणाऱ्यांना ज्यांनी माहिती दिली ती पूर्ण दिली नाही. विरोधकांच्या काल खूप बैठका झाल्या. एकनाथ शिंदेंना धरा..धरा..त्याला राजीनामा मागा. अरे एकनाथ शिंदे तुमच्यासारखे बिल्डरला 350 कोटी रुपये फुकट देत नाही. झोपडपट्टीने अतिक्रमित झालेल्या जमिनीवर 350 कोटी रुपये देता. आता तो बिल्डर एक हजार कोटी मागतोय. मुंबईत धनदांडग्यांना पैसे देऊन भ्रष्ट्राचार केलेला नाही, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केला.

नागपुरातील 83 कोटी रुपये किमतीचा भूखंड एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातला, हा आरोप विरोधकांनी आज केला. या आरोपांचे एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात खंडन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी जे उत्तर द्यायचे ते ऐकायला ताकद लागते. भुजबळ यांनी जो उल्लेख केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर द्यावे, असे काही नाही त्या आरोपात दमच नाही. गुंठेवारीचा कायदा राज्यसरकारने 2001 ला घेतला. 2007 ला 49 ले आऊट होते. ते मंजूर झाले व त्याला नियमितही शासन निर्णयानुसार केले गेले. गुंठेवारीचे पैसे की, रेडीरेकनरचे पैसे घ्यायचे यावर निर्णय झाला.

एकनाथ शिंदे म्हणाले, 2015 ला अभिन्यासातील हे सर्व भूखंड नियमित केले. 34 ले आऊटना मान्यता मिळाली. त्यानंतर 35 व्या ले आऊटला 16 प्लाॅट होते. 2007 च्या शासन निर्णयानुसार मागणी करण्यासाठी संबंधित व्यक्ती गेला तेव्हा तेथील एनआयटी प्रमुखाने त्यांना सांगितले की, गुंठेवारीने पैसे भरा. त्यानंतरच्या एनआयटी प्रमुखाने त्याला रेडिरेकनरप्रमाणे पैसे भरण्याचे सांगितले. 108 नुसार ती व्यक्ती माझ्याकडे अपिलद्वारे आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अपिल माझ्याकडे आल्यानंतर मी सभापती नागपूर सुधारन्यास यांचे 10 फेब्रुवारी 2020 चे आदेशानुसार गुंठेवारी की, रेडिरेकनरने करायचे हे रद्द केले. 2007 चा शासन निर्णयानुसार हा प्लाॅटधारक शासन निर्णयानुसारच्या यादीत होता. तो यादीत असताना त्याला वेगळा न्याय कसा असू शकतो. मी त्यात सांगितले की, शासनाच्या 2007 च्या सहपत्र क्रमांक 1 मधील 49 ले आऊट समाविष्ट आहेत. त्यातील एका ले आऊट अपिलकर्ता यांचाही प्लाॅट आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले प्रन्यायासने अर्थात एनआयटीने उर्वरित प्लाॅट धारकांकडून ज्या सूत्रानुसार जागावाटप आणि लीज करारासाठी रक्कम आकारली असेल त्याच पद्धतीने या अपिलकर्त्याकडून मोबदला व विकासशुल्क आकारावे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या रकमांचा याआधीच भरणा झाला असेल तर त्यानुसार त्याच्यावर कारवाई करावी. रकमा भरणा झाला नसेल, तर त्या प्रधान झाल्यावर लीज करार करून जमीन देण्याची कारवाई करावी. यामध्ये मी कुठल्याही प्रकारे नगरविकास मंत्री म्हणून जे अधिकार मला होते त्यात मी कुठलाही दुरुपयोग केला नाही.

2007 ला शासननिर्णय तसेच 2009 साली शासनाचा दर त्याप्रमाणे आपण संबंधितावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी सखोल जात नाही. ले आऊट धारक यांनी स्टॅम्पड्युटी भरले आहेत. रजिस्ट्रेशन केले आहे. यात माझ्याकडे लोकप्रतिनीधींची पत्रे आहेत. 34 ले आऊटमध्ये 3000 लोक घरे बांधून राहतात.

14 तारखेला मला जेव्हा एनआयटीचे पत्र आले तेव्हा कोर्टात कुणीतरी गेले व न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवले आहे. जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा 2017-18 ला गिलानी समिती नेमली. समितीचे निरीक्षण वेगळे होते. मी ज्यावेळी हा निर्णय दिला तेव्हा कोर्टाचा अंतरिम स्टे नव्हता. गिलानी समिती त्यात नियुक्त केली का? हे माझ्यासमोर येताना ना एनआयटीने दाखवले ना अपिलकर्त्याने दाखवले. ही बाब मुळीच माझ्यासमोर नव्हती. त्यामुळे 2007 ला शासनाने जो निर्णय दिला, त्यानुसारच शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी असा मीही निर्णय दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासनाच्या 2007 चा निर्णय विचारत घेता, जो न्याय मंजूर झालेल्या 34 ले आऊटला लावला गेला तोच न्याय समान न्यायाच्या तत्वानुसार सदर ले आऊटबाबत निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतला तेव्हा उच्च न्यायालयाचे कोणतेही अंतरिम स्थगिती आदेश नव्हते. सदर ३४ ले आऊट मंजूर केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गिलानी समिती स्थापन झाली. या समितीने काही शिफारशी केल्या. या समितीचा सदर अहवाल उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. ही बाब उच्च न्यायालयाच्या १४ डिसेंबर २०२२ च्या निरीक्षणानंतर माझ्या लक्षात आणून दिली. मूळ आदेशावेळी ही बाब माझ्या कुणीही लक्षात आणून दिली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी कुठल्याही कोर्टात हस्तक्षेप केला नाही. एप्रिल 2022 ला अपिलकर्ता आला तेव्हा कोविड होता. 2021 ला हा निर्णय मी पारित केला तो शासनाचाच निर्णय होता. 2007 च्या शासन निर्णयात ले आऊटधारकांची यादी आहे. त्यात एका व्यक्तीला वेगळे कसे काय करू शकता. समान न्याय तत्वाचा विचार केल्यास त्यालाही तोच नियम लावला पाहीजे. हे एनआयटी आहे येथे सर्वसामान्य लोक राहतात. अनेक आमदार, नगरसेवकांची पत्रे आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मविआला झुलवत तुतारी मिळाली अखेर घड्याळाला?

चर्चा, उत्सुकता,गोंधळ आणि शेवटी सारे काही सत्तेच्या बाकावर बसण्यासाठी,विरोधात...

भाजप: बंडखोरी रोखण्यासाठी यादी नाही,थेट फोन करून देणार AB फॉर्म

पुणे :भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव...

भाजपा कार्यालयासमोर दलीत, रिपब्लिकन कार्यकर्ते करणार निदर्शने

पुणे: भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून उमेदवारी देताना दलीत आणि मागासवर्गीय,...

भाजपाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन

पुणे, दि. २८ : भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार...