“जसा रावणाचा जीव…बेंबीत तसा दिल्ली मिळाली तरी यांचा जीव मुंबईत ”

Date:

एकनाथ शिंदे सत्ता पिपासू, उद्या मोदींना पंतप्रधानपदही मागतील – उद्धव ठाकरेंची मुलाखत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दै.सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत भाग २

मुंबईचा घात करण्याची योजना दिसत आहे का? तसंच मुंबईवर शिवसेनेचा जो पगडा आहे तो मिटवण्याचा प्रयत्न होत आहे का? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले “त्यांना तो ठसा पुसायचा आहे. घात नक्कीच होऊ शकतो आणि हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. जसा रावणाचा जीव बेंबीत, तसा या राज्यकर्त्यांचा जीव मुंबईत आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे”.“महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?”“युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो म्हटलं होतं. पण तुम्ही देशात तर पसरु देत नाही. दिल्लीत लाल किल्ल्यावर जाऊन भाषण करण्याची आपली इच्छा नाही. पण निदान महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.“सरकारकडून निर्णयांना स्थगिती देण्याची घाई सुरु आहे. आरे कारशेडच्या निर्णयानंतर माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका असं वारंवार मी सांगत आहे. पर्यावरणाचा घात होईल असं काही करु नका. तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतररही बिबट्यांचा वावर आहे. त्याचा रिपोर्ट माझ्या घरी टेबलावर आहे, तिथे वन्यजीव आहेत. कांजूरच्या ओसाड जागेत केलं तर हीच मेट्रो अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल. आज किंवा उद्या यांना कांजूरमध्ये जावं लागणारच आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.“आरेमध्ये कारशेड करताना कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं असून एवढी जागा वापरणार नाही सांगितलं आहे. पण त्यांना ही जागा वापरावीच लागणार आहे. केवळ तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करु नका. मग हे मुंबईच्या बाहेरचे असल्याने यांना मुंबईबद्दल प्रेम नाही असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो, तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो. मी मुख्यंत्री असताना जिथे शक्य आहे, तिथे वनं वाढवली आहेत याचं समाधान आहे. मुंबईत ८०० एकर जंगल घोषित केलं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.“मुंबई पालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत. मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे. अनेकांनी या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही असं म्हटलं होतं. पण आता मुंबईत मुंबईकर म्हणून सगळे एकत्र झाले आहेत. त्यावेळी यांनी हिंदुत्वात मराठी, अमराठी म्हणत फोडण्याचा प्रयत्न केला होता.ठाकरे म्हणाले, विरोधीपक्ष संपवण्याचा प्रयत्न आहे, सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची भिती वाटत असेल तर तो त्यांचा कमकुवत पणा आहे. आत्ताची परिस्थिती तशीच आहे. सर्व बुडाखाली ठेवले जात असेल तर विरोधी पक्षाची भिती वाटते. सत्ता येते सत्ता जाते हे वाजपेयी म्हणाले पण देश राहण्यासाठी सर्व पक्षांनी काम केले नाही तर आपण आपल्या देशाचे शत्रू आहोत.ठाकरे म्हणाले, मनीष सिसोदीयांना अटक केली जाते आधी अटक नंतर आरोप असे् प्रकार होत आहेत असे कृत्य करणारे सुखात राहू शकत नाही. आज केली जाणारी बदनामी घाणेरडी आणि विकृतपणाचा कळस आहे. सशक्तपणाचे लक्षण नाही.ठाकरे म्हणाले, संजय राऊतांवर आरोप केले जात आहेत त्यांना भाजपमध्ये नेण्यासाठीच हा प्रयत्न केला जात आहे. बाळासाहेब म्हणायचे की, कर्माने मरणाऱ्याला धर्माने मारु नका. भाजपने शत्रुत्व वाढवू नये. सरत्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी वचन बाळासाहेबांना दिला त्यामुळेच हे पद हवे होते हे भाजपने लक्षात घ्यावे.मी मुख्यमंत्री होऊन गेलो त्यामुळे तुम्हाला समस्या का आहेत, भाजप शिवसैनिकांवर अत्याचार करतो ती क्लिप आपण पाहीली नाही का.. बंडखोरांना लालसा आहे, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद वाईट पद्धतीने मिळवले. नरेंद्रमोदींसोबतही तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील लालसा आणि चटक त्यांना आहे.ठाकरे म्हणाले, बदनामी करुन त्यांचा आग्रह असल्याने मी शिवसेनेला दुसऱ्याच्या दाराशी बांधणार नाही. अडीच वर्षे ठरली होती त्यानुसार भाजप वागला नाही. मी हेही भाजपला सांगितले होते की, तूम्ही डेडलाईन द्या मी कागदावर आम्ही मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्याची तारीख लिहून देतो.देवेंद्र फडणवीस निष्ठेने काम करीत आहेत, भाजपने त्यांच्यासोबत जे केले ते चूक असले तरी मी टीका करणार नाही पण त्यांनाही शिंदे् मुख्यमंत्री पटले नाहीत पण त्यांनी पक्षादेश मानला. मी जसा गेलो तेही तसेच मुख्यमंत्री झाले नाहीत. जी गोष्ट माझी नव्हती त्याचे दुखः मला नाही.ठाकरे म्हणाले, मी सीएम पद सोडले आणि घरी गेलो. लोकांनी भरभरुन पद दिले, हे भाग्य क्वचितच कुणाच्या वाट्याला येतो. भाजप आणि शिंदे गट उघडे पडत आहेत. मला भासवले जात होते की, पवार आणि काँग्रेस दगा देणार ती त्यांची ओळख पण तसे झालेच नाही माझ्याच लोकांनी दगा दिला.ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रीपद सोडण्याची नव्हे स्विकारण्याचीच तयारी माझी नव्हती. ते योगाने आले. हम दो एक कमरे मे बंद है असे शिंदे फडणवीसांची गत झाली. त्यांची चाबी दिल्लीत आहे. आमदार अपात्रतेबाबत मी बोलणार नाही हा मुद्दा न्यायालयात आहे. तेदेखील आता मला येऊन भेटत आहेत. मराठी माणसांमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, आजसुद्धा करत आहेत, तेही एकवटले आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात,” असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.ऑगस्टमध्ये दौरे करणारठाकरे म्हणाले, आता आदित्य दौरे करीत आहे, त्याला मोठा प्रतिसाद जनतेने दिला आहे. त्यामुळे आम्हाला मोठे बळ मिळत असून आता मी मैदानात उतरणार आहे. ऑगस्टमध्ये मी राज्यभर दौरा करणार आहेठाकरे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी मी वर्षा सोडून जाताना जनतेच्या डोळ्यात अश्रू होते. या अश्रूंचे मोल मला आहे, त्याची किंमतही मला आहे या विश्वासघातक्यांना मात्र जनतेच्या अश्रूंची किंंमत चुकवावी लागेल. ते म्हणतात की, आम्हाला गद्दार म्हणू नका. मी कुठे त्यांना गद्दार म्हणतोय विश्वासघातकी म्हणत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...