Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती दिनी येतोय ‘एक होता वाल्या ‘

Date:

आरक्षण आणि जातपडताळणीच्या ज्वलंत प्रश्‍नावर एक वास्तववादी चित्रपट
एक होता वाल्या हा अत्यंत संवेदनशील अश्‍या सामाजिक विषयावर आधारीत सामाजिक राजकीय चित्रपट आहे. स्वातंञ्यानंतर पासष्ट वर्षे होऊनही काही आदिवासी जमातींना आजपर्यंत सामाजिक न्याय मिळालेला नाही. जातपडताळणीच्या जाचक़ संदिग्ध आणि मनमानी कार्यप्रणालीमुळे संविधानिक अधिकार असूनही कोळी व
तत्सम हलबा माना गोवारी धनगऱ ठाकूऱ गाबीत कोलघा कोलचा मन्नेवारलू इत्यादी तीस पस्तीस जमाती आजही त्यांच्या न्याय्य हक्कासाठी व आपल्या जातीच्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. जातपडताळणीमुळे ते दिवसेंदिवस विस्तापीत होत आहेत. विस्तापीत होत असलेल्या जमाती सातत्याने आंदोलने उपोषणे धरणे मोर्चे
निवेदनातून आपला आवाज शासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयतक्‍ करीत असतात त्यांच्या या संघर्षमय आंदोलनाचे खरेखुरे प्रतिबिंब म्हणजेच एक होता वाल्या.
तांत्रीक चुकांचा विचार केल्यास जातीची सिध्दता करणे आज कोणत्याही आदिवासी बांधवांना शक्‍य होऊ शकत नाही. याच तांत्रीक बाबींचा आधार घेत जातपडताळणीचे विविध थरातील अधिकारी असंख्य आदिवासी बांधवांना त्यांच्या चालीरिती रूढी परंपरांचा आत्मभानाचा त्यांच्या वंशावळीचा त्यांच्या भौगोलीक वेगळेपणाचा त्यांच्या बुजरेपणाचा त्यांच्या सरसकट मागासलेपणाचा वा त्यांच्या विविध महसुली पुराव्यांचा सद्‌सद्बुध्दीने विचार न करता त्यांना जातीची वैधता नाकारून बोगस आदिवासी ठरवीत आहेत. त्यांना विस्थापीत करीत आहेत. संविधानाच्या विरोधात धुर्त राजकारण्यांच्या चाललेल्या या कुटील कारस्थानाला शह देणारा संघर्षमय
कहाणी म्हणजेच एक होता वाल्या हा समांतर चित्रपट.
स्वातंञ्यानंतरची आरक्षणाविषयीची बदलत जाणारी राजकीय मानसिकता विविध समाजात सातत्याने निर्माण होणारी प्रचंड विषमता केवळ उदरनिर्वाहासाठी आयुष्य खर्ची घालणारे अब्जावधी लोक़ राष्ट्र सर्वकष विकास होण्याऐवजी खाजगीकरणाच्या माध्यमातून स्वार्थी भांडवलदारांची अन नवश्रीमंतांची आलेली लाट
तुटपुंज्या लोकांचा विकास रसातळाला जाणारा बहूजन समाज आणि पायदळी तुडवल्या गेलेली लोकशाहीची आदर्श कल्पना इत्यादी सर्वकाही प्रसंगांच्या आणि चित्रचौकटीच्या माध्यमातून मांडण्याचा लेखक दिग्दर्शक शरदचंद्र जाधव यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
अत्यंत वास्तववादी सामाजिक व राजकीय पार्श्‍वभुमी असलेल्या या चित्रपटाला जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल 2016 मध्ये “बेस्ट पॉलिटीकल फिल्म अवार्ड’ मिळालेले आहे. ही मराठी चित्रपटासाठी प्रशंसनीय बाब आहे. हा चित्रपट दिनांक 14 एप्रील 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती दिनी संपुणमहाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यातील वाल्याची भुमिका स्वतः शरदचंद्र जाधव यांनी केलेली असून राजकीय नेत्याची भुमिका नंदकुमार पाटील यांनी साकारलेली आहे. इतर भुमिकेत प्रियंका ससाणे अरविंद धनू मनोहर भगत सुनिल सोनाऱ मधुसूधन तेलंग़ डॉ. शांताराम सोनवणे यशवंत जोशी हे दिसणार आहेत. तर पत्रकाराच्या भुमीकेत पुणे श्रमीक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्‍याम दौडकर आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण अगस्त्यनाग जाधव यांनी केलेले असून चित्रपटाचे संकलन हर्षवर्धन यांनी केलेले आहे.
तर संगीताची बाजू अशोक वायंगणकरांनी सांभाळलेली आहे. मुकेश ठोमरे यांनी शापमाईण्डस्‌ मुव्हींग इमेजेसच्या माध्यमातून या आशयघन चित्रपटाची निर्मिती केलेली असून विजय कोळी व राजेश मांगेला यांनी निर्मिती व्यवस्था तर राजू कांबळे वितरण व्यवस्था सांभाळली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुणे श्रमीक पत्रकार भवन, पुणे जिल्हा परिषद परिसर आणि पुणे जिल्ह्यात झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

अ. भा. कॉंग्रेस पक्षाच्या ओ.बी.सी. सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी दीप्ती चवधरी

पुणे- अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...