मूकपट, ऍक्शनपट, बोलपट करत करत प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करणारा अवलिया म्हणजे…’भगवान आबाजी पालव’. या नटाने जे केले त्यात आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली. एका रेषेत जाणाऱ्या चित्रपटसृष्टीला भगवान दादांनी एक वेगळे वळण दिले. त्यांनी सिनेसृष्टीला दिलेल्या देणग्या बऱ्याच आहेत.त्यापैकीच एक म्हणजे नृत्यशैली…1930 ते 1940 च्या दशकात भगवान दादांनी एक विशिष्ट नृत्यशैली निर्माण केली जिची हवा आजही ताजी आहे. अगदी सहज व सोप्या नृत्यशैलीने ही लोकांना प्रभावित करता येते, हे भगवान दादांनी दाखवून दिले.
भगवान दादांच्या नृत्याची जादू प्रेक्षकांवर झालीच त्याबरोबर सिनेअभिनेत्यांनीही त्यांची शैली उचलून
धरली. बऱ्याच सिनेअभिनेत्यांनी त्यांची नृत्यशैली आत्मसात केली. डान्सिंग सुपरस्टार म्हणून एक काळ
गाजवणारी नावे म्हणजे ऋषी कपूर, अमिताभ बच्चन आणि मिथून चक्रवर्ती…ही तिन्ही नावे भगवान दादांच्य नृत्यशैलीच्या प्रेमात आहेत. त्यांनी हीच साधी नृत्यशैली आत्मसात करून प्रेक्षकांवर जादू केली. त्यांची स्लोमूव्हींग डान्सिंग स्टाईल प्रेक्षकवर्गाने डोक्यावर उचलून धरली. जुना काळ या नृत्यशैलीने गाजलाच शिवायगोविंदा सारख्या नटानेही याच नृत्यशैलीच्या आधारावर सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
भगवान दादांनी स्टेप्स पेक्षा भावमुद्रेला जास्त महत्त्व दिले. याचाच प्रभाव आपल्याला गोविंदा च्या नृत्यातही अशी अनोखी नृत्यशैली सिनेअभिनेत्यांना देण्याबरोबरच नृत्यदिग्दर्शनाचे क्षेत्रही सिनेसृष्टीला भगवानदादांनीच परिचित करून दिले. साध्या सरळ नृत्यशैलीचे समर्थन करणारा हा नट…ज्याने अलबेला या ब्लॉकबस्टरसिनेमाच्या यशातून आपले नाणे चोख वाजवून दाखवले. आपले नाव सिनेसृष्टीत अजरामर करणाऱ्या या नटाचाजीवनपट उलगडणारा ‘एक अलबेला’ हा चित्रपट…शेखर सरतांडेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मंगेश देसाई हा उमदा कलाकार आपल्याला भगवान दादांच्या भूमिकेत दिसणार आहे तर गीता
बालीच्या भूमिकेत विद्या बालनला आपण पाहू शकणार आहोत.
मंगलमूर्ती फिल्म्स प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित असा हा ‘एक अलबेला’ येत्या 24
जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.